A First AC train cabin decorated like a honeymoon suite goes viral, sparking debate over railway rules. saam tv
देश विदेश

फर्स्ट क्लास केबिनला बनवले 'हनीमून सुट'! रेल्वेच्या डब्यात फुगे आणि रोषणाई; नेटकरी भडकले, पाहा काय आहेत नियम?

Suhagrat Coach Viral Train Decoration Railway Response: १एसी केबिनला हनीमून सूटसारखी सजावट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारावर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर भारतीय रेल्वेने नियम स्पष्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या नेमके काय आहे सत्य.

Omkar Sonawane

सोशल मीडियावर सध्या एका ट्रेनच्या १एसी (1AC) केबिनचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी याला 'सुहागरात कोच' असे नाव दिले आहे. कारण, या संपूर्ण केबिनला गुलाबाच्या फुलांनी इतक्या मनमोहक पद्धतीने सजवण्यात आले आहे की, पहिल्यांदा पाहताच कोणीही थक्क होईल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, यात ट्रेनच्या एका 'सुहागरात कोच'ची झलक पाहायला मिळत आहे. खरं तर, ट्रेनच्या १एसी कोचमधील एका केबिनला एका प्रवाशाने चक्क सुहागरातच्या बेडसारखे डेकोरेट केले आहे. एखाद्या 'हनीमून' सारख्या सजवलेल्या या १एसी केबिनचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यावर प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले आहेत. ट्रेनच्या कोचला अशा प्रकारे सजवता येते का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. यावर आता रेल्वेचे अधिकृत उत्तरही आले आहे.

केबिनमध्ये नेमकी कशी होती सजावट?

ट्रेनच्या १एसी केबिनला चालते-फिरते 'हनीमून बेड' बनवणाऱ्या या व्हिडिओने नेटीझन्सचे प्रचंड लक्ष वेधून घेतले आहे. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. एका बाजूला या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की, ट्रेनच्या आत अशी सजावट करणे योग्य आहे का? तर दुसऱ्या बाजूला अनेकांनी याचे कौतुकही केले आहे.

संपूर्ण केबिन रंगीबेरंगी फुगे, लेस आणि गुलाबाच्या फुलांनी सजवले आहे.

केबिनच्या आतल्या भिंतींवर अनेक गुलाबाची फुले चिकटवण्यात आली आहेत.

जमिनीवर गुलाब आणि इतर फुलांच्या पाकळ्यांचा सडा पसरवला आहे.

केबिनच्या छताला (सीलिंग) अनेक फुगे लावण्यात आले आहेत.

सीटवर फुलांच्या पाकळ्यांनी 'हार्ट शेप' बनवला आहे.

यासोबतच भिंतींवर आकर्षक लायटिंगही करण्यात आली आहे. फुलांच्या मधोमध छोट्या-छोट्या लाइट्स लावल्या आहेत.

केबिनमधील डस्टबिनलाही एका पुष्पगुच्छाचे रूप देण्यात आले आहे.

भिंतीवर 'आय लव्ह यू' असेही लिहिले आहे. एकंदरीत हे संपूर्ण केबिन अत्यंत सुंदर दिसत होते.

ही संपूर्ण सजावट एका प्रवाशाने आपल्या पार्टनरला सरप्राइज देण्यासाठी केली होती. सोशल मीडियावर या क्रिएटिव्हिटीचे कौतुक होत असले, तरी काही लोकांनी भारतीय रेल्वे आणि रेल्वे मंत्र्यांना टॅग करून प्रश्न विचारले होते आणि यावर स्पष्टीकरण मागितले होते. 'ट्रेनच्या डब्यात प्रवाशाला अशी सजावट करण्याची परवानगी असते का? यामुळे रेल्वेच्या सुरक्षेला धोका निर्माण होत नाही का? असे प्रश्न उपस्थित केले गेले.

रेल्वेने दिले हे उत्तर

रेल्वेच्या नियमांनुसार, १एसी (First AC) चे केबिन प्रवाशांना पूर्ण प्रायव्हसी (वैयक्तिक गोपनीयता) प्रदान करते. प्रवासादरम्यान ते संपूर्ण केबिन केवळ त्या प्रवाशासाठीच आरक्षित असते. त्यामुळे ते संपूर्ण केबिनमध्ये आपल्या पद्धतीने प्रवास करू शकतात आणि आपल्या सुविधेनुसार किंवा आवडीनुसार बदल करू शकतात.

रेल्वेचे म्हणणे आहे की, "जर एखाद्या व्यक्तीने स्पेशल कोच बुक केले असेल आणि ते स्वतः सजवले असेल, तर त्यात रेल्वेची कोणतीही भूमिका नसते. प्रवाशांना कशा प्रकारे प्रवास करायचा आहे, हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. यामुळे रेल्वेच्या कोणत्याही नियमाचे किंवा कायद्याचे उल्लंघन होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT