Ahilyanagar Waterfall : धो धो कोसळणारा धबधबा अन् सह्याद्रीच्या सौंदर्याचा सुंदर संगम, अहिल्यानगरमध्ये लपलंय 'हे' ठिकाण

Shreya Maskar

अहिल्यानगर

रंधा धबधबा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील राजूर - भंडारदरा मार्गावर आहे. रंधा धबधबा प्रवरा नदीवर वसलेला असून त्यांची उंची 170-फूट आहे.

Ahilyanagar | google

रंधा धबधबा

रंधा धबधबा हा महाराष्ट्रातील मोठ्या धबधब्यापैकी एक आहे. उंचावरून कोसळणारा रंधा धबधबा पांढऱ्या शुभ्र दुधासारखा भासतो.

Randha Falls | google

भंडारदरा

भंडारदरा हिल स्टेशनजवळ हा सुंदर धबधबा आहे. रंधा धबधबा भंडारदरा बसस्थानकापासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे.

Bhandardara | google

घोरपडा देवी मंदिर

रंधा धबधब्याच्या घाटाजवळ नदीकाठी घोरपडा देवी मंदिर वसलेले आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे.

Ghorpada Devi Temple | google

इतर पर्यटन स्थळे

रंधा धबधब्याला गेल्यावर विल्सन धरण, आर्थर लेक आणि अम्ब्रेला फॉल्स (छत्री धबधबा) ही ठिकाणे पाहायला नक्की जा.

Other tourist destinations | google

निसर्ग सौंदर्य

खाली कोसळणाऱ्या पाण्याचा रंग अनेकदा गडद पाचूच्या रंगासारखा हिरवा दिसतो आणि हा धबधबा आकर्षक खडकाळ रचना आणि वनराईने वेढलेला आहे.

Beauty of nature | google

पक्षी निरीक्षण

दरीच्या खडकाळ कडांवर तुम्हाला मधमाश्यांची मोठी, लटकणारी पोळीही पाहायला मिळू शकतात. पक्षी निरीक्षणासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

Bird watching | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देणारा चिपळूणजवळील किल्ला, प्रत्येक इतिहासप्रेमीने पाहावे असे 'हे' ठिकाण

Chiplun Fort | saam tv
येथे क्लिक करा...