Chinese Travelers Ban In India  saam tv
देश विदेश

HMPV Virus: कुंभमेळ्यावर HMPVचं संकट; चिनी लोकांना थांबवा, साधुंकडून पंतप्रधान मोदींना पत्र

Chinese Travelers Ban In India : चीनी व्हायरसचं सावट उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरले आहे. पार्श्वभूमीवर साधू संतांनी मोदींना पत्र पाठवलंय. त्या पत्रात काय म्हटलंय हे जाणून घेऊ.

Tanmay Tillu

देशात चीनी HMPV चे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडालीय...आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरलंय.. देशविदेशातून कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला येतात... याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी मोदींना पत्र पाठवलंय..काय म्हटलंय या पत्रात पाहूया

कोव्हिडच्या विनाशकारी साथीनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं. आता पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आल्यानं अनेक देश चिंतेत पडले आहेत.या विषाणूमुळे सर्दी आणि कोविड-19 मध्ये दिसायची तशी लक्षणे आढळतात, तसंच याचा प्रसार वेगाने होत असल्याची माहिती आरोग्य संघटनांनी दिलीये. त्यामुळे आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरलंय.

देशविदेशातून कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला येतात. त्यामुळे भारताची चिंता वाढलीये...हा नवा HMPV व्हायरस काय आहे पाहूया.

कोरोना आलाय, लहान मुलांना सांभाळा

HMPV विषाणूची सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक

रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त

HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो

लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो, मुलांना श्वास घेण्यास त्रास

दमा किंवा ब्रॉन्कायटिससारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका

याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय.. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आलीय.. 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु होणार आहे. देशात चीनी HMPV चे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडालीय.कुंभमेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारी घ्यायलाच हवी. अन्यथा पुन्हा कोरोनासारख्या भयावह परिस्थितीचा देशाला सामना करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT