A Hindu shopkeeper receiving treatment after a brutal mob attack in Bangladesh, highlighting rising minority violence. Saam Tv
देश विदेश

बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंदू तरूण लक्ष्य, हिंदू तरूणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Hindu Youth Burned Alive Attempt In Bangladesh: बातमी आहे बांग्लादेशातून... बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणारे हल्ले सुरूच आहेत. गेल्या दोन आठवड्यांत हिंदू तरुणांवर हल्ल्याच्या चार घटना समोर आल्या आहेत. आता तर केउरभांगा परिसरात एका दुकानदाराला जिंवत जाळण्याचा धक्कादायक प्रकार थर्टी फर्स्टच्या रात्री घडलाय. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या या तरुणानं जवळच असलेल्या तलावात उडी घेतली त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावलाय.

Omkar Sonawane

बांग्लादेशात हिंदूंवर दिवसेंदिवस हल्ले वाढताना दिसतायेत. दीपूचंद्र दास या तरूणाला जिवंत जाळण्याची घटना ताजी असतानाच जमावाने आणखी एका हिंदू तरूणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय. खोकन चंद्र असं या तरूणाचं नाव आहे. हा तरुण थर्टी फर्स्टच्या रात्री केउरभांगा बाजार येथील आपलं औषधांचे दुकान बंद करून घरी परतत होता. रात्री 9 च्या सुमारास तिलोई परिसरात दबा धरून बसलेल्या गुंडांनी त्याला रस्त्यात अडवलं. जमावानं आधी त्याला बेदम मारहाण केली. धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केला.

एवढ्यावरच न थांबता नराधमांनी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिलं. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या खोकन यांनं प्रसंगावधान राखत जवळच्या तलावात उडी घेतली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने शरीयतपूर सदर रुग्णालयात दाखल केलं. खोकन याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय. भारतविरोधी तरुण नेता शरीफ ओसमान हादी याच्या हत्येनंतर बांगलादेशात हिंदू समुदायावर हल्ले आणि मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालीय.

हादीच्या मारेकऱ्यांनी भारतात आश्रय घेतल्याच्या अफवेमुळे या आंदोलनाला भारतविरोधी वळण लागलय. या पार्श्वभूमीवर खोकन यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे हिंदू समुदायामध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: 4 राशींचं नशीब पालटणारा! काहींची संकट होणार दूर, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मोदी-शाहांना हायकोर्टानं ठोठावली शिक्षा? पंतप्रधान मोदी-शाह जेलमध्ये जाणार?

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण मैदानात

Purnima Birth: पौर्णिमेला जन्मलेले मुलं कशी असतात?

मुंबईकरांसाठी हक्काचं घर, मोफत बससेवा अन् 100 युनिटपर्यंत वीज, ठाकरेंचं आश्वासन|VIDEO

SCROLL FOR NEXT