Mohan Bhagwat Saam TV
देश विदेश

Mohan Bhagwat: 'भारत एक हिंदू राष्ट्र, सुरक्षेसाठी आपल्याला एकजुट व्हावे लागेल': सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

Gangappa Pujari

RSS Chief Mohan Bhagwat Speech Rajasthan: 'आपण सर्व भारत मातेचे पुत्र आहोत त्यामुळे भारत मातेसाठी जगू आणि मरू. पण भारतात भारतासाठी जबाबदार समाज कोण आहे. तर तो हिंदू समाज आहे कारण भारत हा हिंदू देश आहे,' असे महत्वाचे विधान आरएसएस प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. राजस्थानच्या बारा नगर येथे स्वयंसेवकांच्या एकत्रीकरण कार्यक्रमात शनिवारी (ता. ६ ऑक्टोबर) बोलत होते.

काय म्हणाले मोहन भागवत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी (५ ऑक्टोबर) हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आणि आपापसातील मतभेद आणि वाद संपवण्याचे आवाहन केले. राजस्थानमध्ये बारा नगर येथे स्वयंसेवकांच्या एकत्रीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. भाषा, जात आणि प्रांतावर आधारित मतभेद आणि वाद मिटवून हिंदू समाजाला आपल्या सुरक्षेसाठी संघटित व्हावे लागेल. एकता, सद्भावना आणि बंधनाची भावना असेल असा समाज असावा... असे मोहन भागवत म्हणाले.

आचरणाची शिस्त, राज्याप्रती कर्तव्य आणि ध्येयाभिमुख गुण समाजात आवश्यक असल्याचे ते म्हणाले. समाज केवळ मी आणि माझ्या कुटुंबाने बनलेला नाही, तर समाजाच्या सर्वांगीण चिंतेतून आपण आपल्या जीवनात ईश्वर प्राप्त केला पाहिजे. संघाचे कार्य यांत्रिक नसून कल्पनेवर आधारित आहे. संघाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. संघाचे संस्कार गटनेत्यापर्यंत, गटनेत्यापासून स्वयंसेवकापर्यंत आणि संघाकडून स्वयंसेवकापर्यंत जातात. कुटुंबापासून समाजापर्यंत स्वयंसेवक ही वैयक्तिक विकासाची पद्धत संघात स्वीकारली जाते, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.

"जगामध्ये भारताची प्रतिष्ठा देशाच्या ताकदीमुळे आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदू हे नाव नंतर आले असले तरी आपण येथे प्राचीन काळापासून राहत आहोत. येथे राहणाऱ्या भारतातील सर्व पंथांसाठी हिंदू हा शब्द वापरला जात होता. हिंदू प्रत्येकाला आपले मानतात आणि सर्वांना स्वीकारतात. समाजात प्रचलित असलेल्या उणिवा दूर करून समाज बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजात सामाजिक समरसता, सामाजिक न्याय, सामाजिक आरोग्य, शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाची असायला हवी," असे भागवत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

Chandrapur News : अवैध धंदे रोखण्यासाठी चकपिरंजी ग्रामसभेत अनोखा ठराव; शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी टाकली अट

SCROLL FOR NEXT