Himachal Pradesh Accident Saam TV Marathi
देश विदेश

Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! कार ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून पर्यटकांना घेऊन जाणारी कार ५०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून एसडीआरएफ आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Himachal Pradesh car falls into gorge latest news : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक भयंकर अपघात झालाय. भरधाव वेगात असणारी कार ५०० मीटर खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात कारमधील आठही जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. ही दुर्घटना बैरागढ-साच पास-किल्लार रस्त्यावर शुक्रवार, २९ मे रोजी उशिरा रात्री घडली. मात्र दरी अत्यंत खोल असल्याने शनिवारी संध्याकाळी स्थानिक नागरिकांना या अपघाताची माहिती मिळाली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशातील सर्वात कठीण रस्ता असलेल्या सच पासच्या दिशेने गाडी जात असताना हा अपघात झाला. बंगळूरहून आलेल्या एका पर्यटक कुटुंबाने दालहौसी या पर्यटन शहरात फिरण्यासाठी एक टॅक्सी बुक केली. या कुटुंबाने दालहौसीमध्ये थांबलेल्या दुसऱ्या एका पर्यटक कुटुंबासोबत ती गाडी शेअर केली आणि ते एकत्र साच्छे जोत प्रदेशातील बर्फाच्छादित पर्वतांचा आनंद घेण्यासाठी निघाले होते, पण वाटेतच काळाने घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या गाडीत दोन मुले आणि चालकासह एकूण नऊ जण होते.

अपघात झाला तो परिसर धोकादायक वळणांमुळे, अरुंद रस्त्यांमुळे आणि मुसळधार बर्फवृष्टीमुळे आधीच धोकादायक मानला जातो. प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या वेळी दृश्यमानता अत्यंत कमी होती आणि रस्ता खूप निसरडा होता. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ५०० फूट खोल दरीत कोसळली. शुक्रवार रात्रीपर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती. शनिवारी दुपारी जवळून जाणाऱ्या काही गावकऱ्यांनी अपघातग्रस्त वाहनाचे अवशेष पाहिले आणि तात्काळ प्रशासनाला कळवले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळावरील दुर्गम भूभागामुळे बचाव आणि मदतकार्यात अडथळा येत होता. तीव्र उतार, खोल दऱ्या आणि बर्फाच्छादित प्रदेशामुळे बचाव पथकांसमोर मोठी आव्हाने उभी राहिली. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्व आठ जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत आणि काही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

SCROLL FOR NEXT