Blast In Firecracker Factory
Blast In Firecracker Factory Saam Tv
देश विदेश

Himachal Pradesh: फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 महिला कामगार जिवंत जळून खाक

वृत्तसंस्था

हिमाचल प्रदेश: उना जिल्ह्यात एका कारखान्यात स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे . जिल्ह्यातील ताहलीवाल येथील कारखान्यात झालेल्या या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटात 7 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, सर्व जखमींना उना येथील रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यासोबतच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट उनाच्या हरोली येथील ताहलीवाल येथील फटाक्यांच्या कारखान्यात झाला आहे. येथे अपघातानंतस्फोटानंतर घटनास्थळी आग लागली आणि कामगार महिला जिवंत जळून खाक झाल्या आहेत. सध्या तरी ही आग विझवण्यात आली आहे. त्याचबरोबर जखमींना उना रुग्णालयात आणण्यात आले आहे. जखमींची संख्या अद्याप कळू शकलेली नाही. मात्र स्फोटानंतर सहा मृतदेह घटनास्थळी पडलेले दिसून आले असून ते सर्व महिलांचे आहेत. मृतांमध्ये तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश असून स्फोटावेळी ती तिच्या आईसोबत होती. सध्या जिल्हा प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवणे बाकी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media: सोशल मीडियाच्या 'या' चुका टाळा; नाहीतर हेल्थी रिलेशनशीप होईल अनहेल्थी

Traffic Jam In Pune: सुट्ट्यांमुळे वर्दळ वाढली, वाहनांच्या संख्येत वाढ; पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

Nashik Lok Sabha: ठाणे-कल्याणचं ठरलं, आता नाशिकचं कधी? चंद्रशेखर बावनकुळेंनी भुजबळांसमोरच सांगितलं

Today's Marathi News Live : नाशिक लोकसभेच्या जागेची घोषणा CM शिंदे करणार - संजय शिरसाट

Covishield Vaccine : घाबरू नका! Covishield घातक नाही; कोरोनाविषयी प्रत्येक अपडेट देणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT