Covishield Vaccine
Covishield VaccineSaam TV

Covishield Vaccine : घाबरू नका! Covishield घातक नाही; कोरोनाविषयी प्रत्येक अपडेट देणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडिओ आला समोर

Covishield Vaccine is Safe : नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशात कोरोना काळात प्रत्येक गोष्टीची अपडेट देणाऱ्या डॉ. रवी गोडसे यांनी नागरिकांना अजिबात न घाबरण्याचं आवाहन केलं आहे.

भारतात अनेक व्यक्तींनी कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी कोविशील्ड वॅक्सीन घेतली आहे. आता ही वॅक्सीन बनवलेल्या ॲस्ट्राझेनेका कंपनीने युके न्यायालयामध्ये या लसीमुळे होणारे दुष्परिणाम स्वीकारले आहेत. त्यामुळे भारतात एकच खळबळ उडालीये. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशात कोरोना काळात प्रत्येक गोष्टीची अपडेट देणाऱ्या डॉ. रवी गोडसे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Covishield Vaccine
Polio Vaccine Campaign 2024: राज्यात ९५ लाखाहून अधिक बालकांना देण्यात आला पोलिओचा डोस, आरोग्य विभागाची माहिती

ॲस्ट्राझेनेका कंपनीने युके न्यायालयामध्ये या लसीमुळे होणारे दुष्परिणाम स्वीकारल्यानंतर ही वॅक्सीन घेतलेल्या व्यक्तींचे रक्त गोठते, रक्ताच्या गाठी तयार होतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर रवी गोडसे यांनी सविस्तर माहिती देत नागरिकांच्या मनातील भीती दूर केली आहे.

अजिबात घाबरू नका

तुम्ही कोविशील्ड घेतली असेल तर या तीन कारणांमुळे अजिबात घाबरू नका.

१. दुष्परिणाम व्हायचा असता तर तो २ ते ३ दिवसांत झाला असता. तुम्हाला लस घेऊन आता जवळपास ३ वर्षे झाली आहेत.

२. याचा दुष्परिणाम १ कोटी व्यक्तींमध्ये एखाद्या व्यक्तीला होतो. त्यामुळे निश्चिंत राहा.

३. तरुण मुलींमध्ये याचे दुष्परिणाम जास्त दिसून येतात, असं म्हटलं जात आहे. मात्र तरुण मुलींना जरी त्रास व्हायचा असता तर तो ३ दिवसांमध्येच झाला असता. त्यामुळे तरुण मुलींनी देखील घाबरू नका, असं डॉ. रवी गोडसे यांनी सांगितलं आहे.

कोविशील्ड वॅक्सीन भारतात देण्यास सुरूवात केली तेव्हा देखील युरोपमध्ये त्यावर बंदि आणण्यात आली होती. मग तरी देखील ही वॅक्सीन नागरिकांना का दिली गेली? असाही प्रश्न आता काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यावर देखील डॉ. रवी गोडसेंनी उत्तर देताना म्हटलं की, लस देताना तरुण मुलींनी शक्यतो कोवॅक्सीन लस घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच संशोधन सुरू असताना यामुळे होणारा त्रास हा १ कोटींमध्ये अवघ्या १६ व्यक्तींना कदाचित होईल अशी माहिती समोर होती. त्यामुळे अंकगणितानुसार कोविशील्ड लस योग्य असून ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी कारण सांगताना डॉ. रवी म्हणाले की, १ कोटींमध्ये १६ व्यक्तींना साइड इफेक्ट झाला असता आणि ते दगावले असते तरी कोरोनामुळे नागरिक दगावले नसते. कोरोनामुळे दररोज हजारो आणि जगभरात लाखोंच्या संख्येने मृतांचे आकडे समोर येत होते. त्यामुळे अशा ही महामारी रोखण्यासाठी अंकगणितानुसार कोविशील्ड लस देण्याचा निर्णय घेतला गेला.

Covishield Vaccine
Covishield Vaccine : तुम्हीही Covishield लस घेतली आहे? दुष्परिणामांसह तुमच्या जिवाला किती प्रमाणात धोका, वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com