Himachal Pradesh Accident News Saam Tv
देश विदेश

Himachal Pradesh Accident News: मोठी दुर्घटना! जीप ३०० मीटर खोल दरीमध्ये कोसळली, ६ पोलिसांसह ८ जणांचा मृत्यू

Himachal Pradesh Car Accident: या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Priya More

8 People Dead After Car Accident In Himachal: हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. भरधाव जीप दरीत कोसळली. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Himachal Pradesh Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशच्या चंबा जनपदमध्ये ही अपघाताची घटना घडली आहे. तीसा-बैरागड महामार्गावर तराई पुलाजवळ हा अपघात झाला. भरधाव जीप ३०० मीटर खोल दरीत कोसळून नदीमध्ये पडली. या जीपमधून ९ पोलीस कर्मचाऱ्यांसह ११ जण प्रवास करत होते. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा पोलीस आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. या अपघातामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये एक उपनिरीक्षकसह ५ पोलिसांचा समावेश आहे. हे पोलीस बैरागड येथे तैनात होते. ते पेट्रोलिंगसाठी जात असताना हा अपघात झाला. सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. डोंगरावरुन खाली आलेला एक दगड थेट जीप चालकाच्या डोक्यावर पडला. त्यानंतर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट नदीमध्ये कोसळली.

अपघातातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एसआय राकेश गौर, हेड कॉन्स्टेबल प्रवीण टंडन, कॉन्स्टेबल कमलजीत, सचिन आणि अभिषेक अशी मृत पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर मृत चालकाचे नाव चंदू राम (39 वर्षे) असे आहे. तर पंकज कुमार असं मृत स्थानिक नागरिकाचे नाव आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT