Hijab Controversy: Priyanka Gandhi Trolled After her Tweet And Bikini Is Trending
Hijab Controversy: Priyanka Gandhi Trolled After her Tweet And Bikini Is Trending Saam TV
देश विदेश

Hijab Controversy: "बिकीनी घालून कुणी शाळेत जातं का?" प्रियंका गांधींच्या 'त्या' ट्विटनंतर Bikini ट्रेंड आणि प्रियंका ट्रोल...

साम टिव्ही

देशात हिजाब प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. कर्नाटकात सुरु झालेल्या हिबाज परिधान करण्याच्या वादामुळे आता इतर राज्यातही राजकारण होत आहे. महाविद्यालयीन मुलींनी वर्गात हिजाब परिधान करण्यावर एका महाविद्यालयानं बंदी आणली होती, त्यानंतरही काही मुली हिजाब (Hijab Controversy) परिधान करुन महाविद्यालयात आल्यानं हा वाद निर्माण झाला होता. याबाबत कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुलींना व्यक्तीस्वातंत्र्य आहे असं म्हणत त्या हवं ते परिधान करु शकतात असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर ट्विटरवर चक्क बिकीनी (#Bikini) हा हॅशटॅग ट्रेंड होत असून अनेकांनी प्रियंका गांधींनाच (Priyanka Gandhi) ट्रोल केलं आहे. ("Does anyone go to school wearing a bikini?" After Priyanka Gandhi's 'that' tweet, Bikini Trend and Priyanka Trolled)

हे देखील पहा -

प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या?

हिजाब प्रकरणावर भाष्य करत प्रियंका गांधीनी मुलींना त्रास न देण्याचं आवाहन केलंय. आपल्या ट्विटमधून त्या म्हणाल्या की, "मुलींनी बिकीनी, घुंगट, जीन्स किंवा हिजाब यांपैकी काय परिधान करावं हा त्यांचा अधिकार आहे. आणि तो अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. त्यांना त्रास देण बंद करा. स्त्री आहे, लढू शकते (#ladkihoonladsaktihoon) हा हॅशटॅग त्यांनी जोडला आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. राहुल गांधींनीही या ट्विटचं समर्थन केलं आहे. मात्र अनेकांनी प्रियंका गांधीना ट्रोलही (Trolled) केलं आहे.

"बिकीनी घालून कुणी शाळेत जातं का?"

प्रियंका गांधी यांच्या ट्विटनंतर रिचा अनिरुद्ध यांनी प्रियंका गांधींना प्रश्न विचारला की, "प्रियंकाजी मला एक सांगा, बिकीनी, घुंगट किंवा जीन्समध्ये" शाळेत कोण जातं? असा प्रश्न विचारत त्या म्हणाल्या की, कृपया तथ्यांवर बोलू द्या! प्रश्न शाळेच्या गणवेशाचा आहे बाकी काही नाही! भारतीय महिलांच्या पिढ्यांनी प्रतिगामी पर्दा व्यवस्थेपासून मुक्त होण्यासाठी संघर्ष केला आहे. तुम्हाला ते परत हवे आहे का? भारताला इराण बनवायचे आहे? असा सलाव त्यांनी प्रियंका गांधीना ट्विटरवर केलाय. अनेक यूजर्सने प्रियंका गांधींवर अतिशय खालच्या स्तरावर टीका केली आहे त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

हिजाबचा वाद कसा सुरू झाला?

हा सर्व वाद गेल्या महिन्यात जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश केल्याने सुरू झाला होता. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई केली होती, परंतु तरीही त्यांनी तो परिधान केला होता, यावरून वाद निर्माण झाला होता. या वादानंतर इतर महाविद्यालयांमध्येही गदारोळ झाला.

अलीकडेच शिमोगामध्येही हिजाबच्या वादावरून कॉलेजमध्ये मोठा गदारोळ झाला होता. पोलिसांना येऊन प्रकरण शांत करावे लागले. या सर्व परिस्थितीत कर्नाटक सरकारने काही दिवसांपूर्वी कर्नाटक शिक्षण कायदा-1983 चे कलम 133 लागू केले आहे. त्यामुळे आता सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे.

हिजाब हा शाळेच्या गणवेशाचा भाग नाही. यावर मुस्लीम मुलींचे म्हणणे आहे की, त्या आधी हिजाब परिधान करून शिकत आहेत, याआधी कधीही यावरून वाद झाला नाही. हिजाबचे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातही पोहोचले. त्यावर आज सुनावणी होणार आहे. याबाबत कोर्टानं म्हटलं की हा निर्णय ते फक्त कायद्यानेच घेणार आहेत, भावनेने नाही. यासाठी न्यायालयाने कुराणाची प्रत मागवली असून त्या आधारे पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

दरम्यान उडुपी, शिवमोग्गा, बागलकोट आणि कर्नाटकातील इतर भागात मंगळवारी हिजाबच्या समर्थनार्थ आणि निषेधार्थ निदर्शने झाल्यानंतर काही शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिस आणि प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. शिवमोग्गा येथे दगडफेकीनंतर कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Student Aadhar Card Update : २ लाख ७४ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे

Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणखी एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार, दिग्गज स्टारकास्टसोबत करणार स्क्रिन शेअर

Today's Marathi News Live : खालच्या पातळीवरचं राजकारण केवळ भाजपच करू शकतं; आदित्य ठाकरे

Pune News | गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू

ICC Women's T20 WC: ICC कडून महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! या दिवशी भिडणार भारत- पाकिस्तान संघ

SCROLL FOR NEXT