देश विदेश

Independence Day 2024: दिल्ली आणि पंजाब हायअलर्टवर; स्वातंत्र्यदिनाच्या आदल्यादिवशीच पोलिसांची मोठी कारवाई, २ दहशतवादी ताब्यात

High alert To Delhi And Punjab jammu Kashmir for terror attack : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि पंजाबमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जातेय.

Rohini Gudaghe

मुंबई : दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आलीय. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्ली आणि पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये सक्रिय दहशतवादी प्राणघातक हल्ले करण्याची योजना आखत आहेत. दिल्लीशिवाय पंजाबमध्येही सुरक्षा दलांना अलर्टवर ठेवण्यात आलंय. दहशतवाद्यांमधील संभाषणाच्या आधारे गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिलीय. हा हल्ला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच होईल, असं नाहीये. कारण त्यादिवशी प्रचंड सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. पण एक-दोन दिवसांनी दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता असल्याचा अंदाज गुप्तचर यंत्रणेनं वर्तवला आहे.

१ जून रोजी स्फोटकांची एक खेप जम्मू शहराच्या एका अंतर्गत भागामध्ये (High alert To Delhi And Punjab) पोहोचली. या स्फोटकांचा वापर पुढील काही दिवसांमध्ये सुरक्षा आस्थापने, छावण्या, वाहने किंवा महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो," असं गुप्तचर यंत्रणेला माहिती दिलेल्या सुत्रांनी म्हटलंय.

दिल्ली आणि पंजाब हायअलर्टवर

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये दोन संशयित दिसले होते. ते दिल्लीच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. या लोकांकडे शस्त्रेही असल्याचं समजतंय. हे लोक पठाणकोटच्या दिशेने (terror attack) गेलेत. तेथून ते दिल्लीच्या दिशेने जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. एवढंच नाही तर अमरनाथ यात्रेमध्ये देखील हल्ला होण्याची भीती सुरक्षा दल आणि यंत्रणांना आहे. याशिवाय दिल्लीतील नामांकित संस्थांना लक्ष्य केलं जाऊ शकतं, असं सुरक्षा यंत्रणेकडून सांगितलं जातंय. गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा दल आणि यंत्रणांना दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यात यश येतंय.

अतिरेकी जास्त वर्दळ असलेल्या भागावर हल्ला करू शकतात, अस सुरक्षा यंत्रणेनं अलर्टमध्ये म्हटलंय. काश्मीरच्या तुलनेत जम्मू विभागात दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या (independence day 2024) आहेत. कठुआ, डोडा, उधमपूर आणि राजौरी या जिल्ह्यांत दहशतवादी हल्ले वाढले आहेत. आता हे दहशतवादी पंजाब आणि दिल्लीच्या दिशेने जात असल्याची भीती वर्तवली जातेय.

पोलिसांची मोठी कारवाई

राजधानी अजुनही त्यांच्या ताब्यात आहे, असा संदेश अतिरेक्यांना दिल्लीत हल्ला करून द्यायचाय. याआधीही अनेक वेळा माहिती मिळाली होती की, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटना दिल्लीवर हल्ल्याची योजना आखत (Delhi News) आहेत. दिल्ली आणि पंजाब व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमध्येही सुरक्षा दलं हाय अलर्टवर आहेत. लाल चौकसारख्या भागात सुरक्षा दले सज्ज झाले असल्याची माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT