Hemant Soren Oath Ceremony saam tv
देश विदेश

Hemant Soren Oath Ceremony : हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री; शिक्षण, राजकीय प्रवास जाणून घ्या!

Jharkhand Chief Minister Hemant Soren : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चौथ्यांदा ते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.

Nandkumar Joshi

झारखंड विधानसभा निवडणूक निकालानंतर पाच दिवसांनी झारखंडमध्ये नवं सरकार आलं आहे. हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. रांची येथील मोरहाबादी मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा झाला. सोरेन यांनी राज्याचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला मोठा विजय मिळाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. सोरेन यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल संतोष गंगवार यांनी सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

हेमंत सोरेन हे चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सहा ते आठ मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात सोरेन यांनीच शपथ घेतली. रांची येथील मोरहाबादी मैदानात झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त कुणाचाही शपथविधी झाला नाही. या सोहळ्याला त्यांचे वडील आणि राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेले शिबू सोरेन देखील उपस्थित होते.

हेमंत सोरेन सरकार स्थापन झालंय. या सोहळ्याला इंडिया आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे उपस्थित होते.

झारखंडमध्ये ५६ जागांवर विजय

झारखंड विधानसभा निवडणूक नुकतीच झाली. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, आरजेडी आणि डावे पक्ष यांची आघाडी रणांगणात होती. झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीने ५६ जागांवर विजय मिळवला. झारखंड विधानसभा सदस्यांची एकूण संख्या ८१ असून, बहुमताचा जादुई आकडा ४१ इतका आहे.

कोण आहेत हेमंत सोरेन?

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे ते चिरंजीव आहेत. १० ऑगस्ट १९७५ ला त्यांचा जन्म झाला. १९९० मध्ये पाटणाच्या एमजी हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण केलं. त्यानंतर १९९४ मध्ये पाटणा हायस्कूलमधून इंटरमीडिएटपर्यंतचं शिक्षण घेतलं. मात्र, काही कारणांमुळं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं नाही. त्यानंतर रांचीच्या बीआयटीमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पण तिथेही त्यांनी शिक्षण पूर्ण केलं नाही. शिक्षणानंतर सोरेन यांनी इंजिनीअरिंग कंपन्यांसमवेत काम केलं. कल्पना सोरेन यांच्याशी त्यांनी लग्न केलं त्यांना दोन मुलं आहेत. हेमंत यांच्या पत्नी कल्पना यांनी देखील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

राजकीय प्रवास

हेमंत सोरेन यांना त्यांच्या घरातूनच राजकीय बाळकडू मिळालं. त्यांचे वडील शिबू सोरेन स्वतः तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. हेमंत यांचे मोठे बंधू दिवंगत दुर्गा सोरेन ये आमदार होते. हेमंत यांनी २००५ मध्ये दुमकाच्या स्टीफन मरांडी यांच्याविरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. पण त्यात ते पराभूत झाले होते.

जून २००९ मध्ये राज्यसभेवर सदस्य म्हणून निवड झाली. २००९ च्या अखेरीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते दुमका मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. आमदार झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

सप्टेंबर २०१० ते जानेवारी २०१३ पर्यंत ते झारखंडचे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर काँग्रेस आणि राजदच्या पाठिंब्याने सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री झाले. जुलै २०१३ मध्ये पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ अवघ्या १७ महिन्यांचा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT