Ebrahim Raisi helicopter crash Saam Tv
देश विदेश

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

साम टिव्ही ब्युरो

Ebrahim Raisi Helicopter Crash News:

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर अझरबैजानमध्ये क्रॅश झाल्याची बातमीस समोर येत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जमखी झाले आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर आहे, त्यापैकी एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम रायसी यांच्या ताफ्याशी संपर्क तुटला आहे. ड्रोनचा वापर करून ताफ्याचा शोध घेतला जात आहे.

रायसी हे इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतात हेलिकॉप्टरने प्रवास करत होते, असं सांगितलं जात आहे. इराणची राजधानी तेहरानपासून 600 किलोमीटर अंतरावर अझरबैजानच्या सीमेवर असलेल्या जोल्फाजवळ हा अपघात झाला.

इराणच्या सरकारी टीव्हीनुसार, बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र खराब हवामानामुळे त्यांना अडथळे येत आहे. येथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इराणच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम रायसी रविवारी सकाळी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी तिथे गेले होते. दोन्ही देशांमधील आरस नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे. तेथून परतत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT