Nepal Helicopter Crashes AP
देश विदेश

Helicopter Crashes: नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, ५ प्रवाशांचा मृत्यू

Nepal Helicopter Crashes: नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. यामध्ये ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रसुवाला जाणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये फक्त पाच जण होते असे सांगण्यात येत आहे. यामध्ये चार चिनी नागरिकांचा सहभाग होता.

Bharat Jadhav

काठमांडू : नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टरला कोसळल्याची घटना घडलीय. या अपघातात ४ ते ५ जणांचा मृत्यू झालाय. रसुवाला जाणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये फक्त पाच जण होते असे सांगण्यात येत आहे. यातील चार जण चीनचे नागरिक होते. गेल्या काही दिवसापूर्वी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचा अपघात झाला होता. यात १८ जणांचा मृत्यू झाला होता. ही विमान कोसळण्याची दुर्घटना २४ जुलै रोजी घडली होती.

खराब व्यवस्थापनामुळे नेपाळमध्ये विमान अपघात होत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना जेथे घडली होती तेथे मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ही घटना आज घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील नुवाकोटमधील शिवपुरी भागात या हेलिकॉप्टरला अपघात झाला. यामध्ये एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर कोसळले. विमानातील सर्व ५ जणांचा मृत्यू झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका सूत्राने हिमालयन टाईम्सला सांगितले की, हेलिकॉप्टर काठमांडूहून निघाले होते आणि सयाफ्रुबेन्सीकडे जात असताना ते क्रॅश झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT