तामिळनाडू: ९ डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या (Tamil Nadu) निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जण ठार झाले. या दुर्घटनेतील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर तामिळनाडूतील वेलिंग्टन (Wellington) येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये (hospital) उपचार सुरू होते. अखेर आज त्यांचीही प्राणज्योत मालवली आहे. या दुर्घटनेतील हा चौदावा आणि अखेरचा मृत्यू ठरला आहे. भारतीय हवाई दलाने ट्विट करत ही दुखःद बातमी दिली आहे. (Helicopter Crash: The battle with the death of Group Captain Varun Singh finally ended)
हे देखील पहा -
काय होती घटना?
भारताचे प्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत हे डिफेन्स सर्विसेस स्टाफच्या वेलिंगटनच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आपल्या पुर्वनियोजित कार्यक्रमाला जात होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य बारा जण प्रवास करत होते. एअर फोर्सच्या (Indian Air Force) MI15V5 या हेलिकॉप्टरमधून त्यांनी ११:४८ वाजता सुलुर एअरबेस वरुन उड्डाण केले. त्यांना १२:१५ वाजता वेलिंगटनमध्ये लॅंड करायचे होते. १२:०८ वाजता हेलिकॉप्टरचा सुलुर एअरबेसशी संपर्क तुटला. नंतर सुलुरच्या जंगलात स्थानिकांनी आग बघितली आणि त्याठिकाणी धाव घेतली. तेव्हा त्यांनी हेलिकॉप्टरला आग लागलेली असल्याचं बघितलं. स्थानिक प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरु केलं. त्यांनी जळत असलेल्या हेलिकॉप्टरमधून लोकांना बाहेर काढलं आणि वेलिंगटनच्या सैन्य रुग्णालयात नेण्यात आलं.
या दुर्घटनेत १४ पैकी १३ लोकांच्या मृत्यू झाला होता. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनेंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पी. एस. चौहान, स्क्वॉड्रन लीडर के. सिंह, जेडब्ल्यूओ दास, जेडब्ल्यूओ प्रदीप ए., हवलदार सतपाल, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक साइ तेजा अशी दुर्घटनेतील मृतांचा नावे होती. यात आता ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचाही समावेश झाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.