Himachal Pradesh Flood  Saam tv
देश विदेश

Himachal Pradesh Flood : हिमाचलच्या धर्मशाळामध्ये पावसाचा धुमाकूळ; पुरात १५ ते २० जण वाहून गेल्याची भीती

Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळामध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. या पुरात काही मजूर वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने धूमाकूळ घातला आहे. हिमाचलच्या कुल्लूमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. धर्माशालाजवळील मणुणी खड्डमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या पुरात १५ ते २० मजूर वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत दोन मजुरांचा मृतदेह सापडले आहेत. या मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

धर्मशाळाचे आमदार सुधीर शर्मा यांनी दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अनेक मजूर किनाऱ्याजवळील शेडमध्ये राहत होते. मात्र, अचानक आलेल्या पुरामुळे अनेक मजूर वाहून गेले'. या दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांना वर्मा यांनी श्रद्धांजली वाहिली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने बचाव कार्याला सुरुवात केली. एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. एकाचा मृतदेह लुंटा परिसरात आढळला आहे. तर दुसरा मृतदेह हा नगुणीजवळील खड्ड भागात आढळला. पुरात वाहून गेलेले मजूर हायड्रो प्रकल्पासाठी काम करत होते. मुसळधार पावसामुळे अनेक मजूर कामावर पोहोचले नव्हते. यातील बहुतांश मजूर हे दुसऱ्या राज्यातील आहेत. स्थानिक मजुरांची संख्या फार कमी आहे.

दोघांचे मृतदेह आढळले

धर्मशाळेतील प्रशासकीय अधिकारी मोहित रत्न यांनी सांगितलं की, 'पुरात वाहून गेलेले मजूर आणि नुकसान याची माहिती गोळा करण्याचं काम सुरु आहे'. कांगडाच्या एसएसपी शालिनी अग्निहोत्री यांनी म्हटलं की, आतापर्यंत दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. बचाव कार्य सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT