यूएईच्या विविध भागात सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका दुबईला बसला आहे. मंगळवारी दुबईत एका दिवसातच वर्षभराचा पाऊस पडलाय. त्यामुळे संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून विमानतळ, मेट्रो स्टेशनसह रस्ते पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय शेकडो इमारतीत पाणी शिरलंय. (Breaking Marathi News)
त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टची रनवे पाण्याखाली गेली आहे. या फटका विमान वाहतुकीला बसला आहे. विमानाची उड्डाणे लांबल्याने प्रवासी ताटकळले आहेत. पावसामुळे (Rain Update) पूरस्थिती निर्माण झाल्याने शाळा तसे कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मंगळवारी दुबई विमानतळावर अवघ्या १२ तासांत सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली असून २४ तासांत एकूण १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, दुबई शहरात वर्षभरात सुमारे ८८.९ मिमी पावसाची नोंद होते. (Latest Marathi News)
पण, मंगळवारी एकाच दिवसांत दुबईत १०० मिमी पाऊस पडलाय. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येऊ शकते. पुढील काही तासांत दुबईत तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय. काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.
दुबईत सुरू असलेल्या पावसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंगळवारी ओमानमध्ये देखील तुफान पाऊस झालाय. ज्यामुळे अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.