चीनमध्ये पावसाचा हाहाकार! पुरात 25 जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

चीनमध्ये पावसाचा हाहाकार! पुरात 25 जणांचा मृत्यू

चीन येथील मध्य हेनान प्रांतामध्ये बुधवारपासून पडत असलेल्या पावसाने पूर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीजिंग : चीन china येथील मध्य हेनान Henan प्रांतामध्ये बुधवारपासून पडत असलेल्या पावसाने Rain पूर Flood आला आहे. आतापर्यंत २५ जणांचा या पुरामध्ये मृत्यू झाल आहे. या भागात १ हजार वर्षांत यावर्षी प्रथम अतिवृष्टी एवढी मोठी झाली आहे. या भागामधील भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरले आहे. या मार्गात हॉटेल Hotel, सार्वजनिक स्थळी अडकलेल्या नागरिकांची सुटका देखील करण्याचा आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्यदलाला दिले आहे.

पाऊस आणि पुरामुळे १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी पाठविण्यात यश आले आहे. आयुष्यात एकदा घडणाऱ्या घटनेपैकी हा पूर असल्याचे, वर्णन हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. या पुरामुळे झेंगझाऊ या शहरात नासधूस झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी सर्व भागात पीपल्स लिबरेशन आर्मीचे पीएलए PLA सैनिक तैनात करण्याचा आदेश देखील शी जिनपिंग यांनी यावेळी दिला आहे. नागरिकांची सुरक्षा आणि मालमत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहे.

हे देखील पहा-

यानुसार पीएएलच्या सेंट्रल थिएटर कमांडने हेनान प्रांतात लगेचच सैनिकांच्या तुकड्या पाठविले आहेत. चीनी सोशल मीडियावर social media व्हायरल Viral झालेल्या, काही व्हिडिओमध्ये Video झेंगझाऊ स्थानकावर मेट्रो रेल्वेमध्ये पुराचे पाणी शिरून, प्रवाशांच्या गळ्यापर्यंत पोचल्याचे यातुन दिसत आहे. गाडीत खांब किंवा अन्य वस्तूंचा आधार घेऊन, प्रवासी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचेही या मध्ये बघायला मिळाले आहे. शहरामधील वाहतुकीलाही देखील मोठा फटका बसला आहे.

अनेक बस मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर १६० रेल्वे थांबविले, तर या ठिकाणी विमानतळावर २६० विमाने उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पोलिस आणि अग्निशमन दल व अन्य कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त भागामध्ये बचाव आणि शोध कार्य सुरू केले आहे. भुयारी मार्गामधील पाणी थोडे प्रमाणात ओसरू लागले आहे. प्रवासी सुखरूप आहेत, या बद्दलची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. झेंगझाऊ शहरात मध्यवर्ती भागामध्ये मंगळवारपासून २४ तासांमध्ये ४५७.५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

चीनमध्ये हवामानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासूनचा हा सर्वांत मोठा पाऊस झाला आहे, असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेने यावेळी सांगितले आहे. हेनान प्रांतामध्ये अनेक सांस्कृतिक स्थळे देखील आहेत. उद्योग आणि शेती हे या ठिकाणी मुख्य व्यवसाय आहे. बौद्ध भिख्खूंच्या मार्शल आर्टकरिता प्रसिद्ध असलेले शाओलिन मंदिर देखील पुरामुळे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

झेंगझाऊ या ठिकाणी पुरामुळे लुयांग शहरात धरणाला २० मीटर लांबीचा तडा गेला आहे. धरण कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती पीपल्स लिबरेशन आर्मीने सिना विबो या सोशल मीडिया व्यासपीठावर त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून सांगितले आहे. धरणामधील पाण्याचा फुगवटा होऊ नये, याकरिता हे धरण फोडून त्यामधील पाणी बाहेर सोडण्यात आले आहे. हे काम मंगळवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT