चमत्कार! पार्किंगमध्ये फक्त एकाच गाडीवर पडला मुसळधार पाऊस (पहा Video)
चमत्कार! पार्किंगमध्ये फक्त एकाच गाडीवर पडला मुसळधार पाऊस (पहा Video) Twitter/@Jogja_Uncover
देश विदेश

चमत्कार! पार्किंगमध्ये फक्त एकाच गाडीवर पडला मुसळधार पाऊस (पहा Video)

वृत्तसंस्था

Indonesia: जगात अनेक विचित्र घटना घडत असतात. अशीच एक काही विचित्र घटना इंडोनेशियन शहरातील बेकासी येथे घडली आहे. येथील एका रहिवाशाने एका दुर्मिळ हवामान घटनेचे चित्रीकरण केले आहे. शहरात वादळादरम्यान पाऊस पडू लागला, परंतु तो पाऊस फक्त एका कारवरच पडत होता. हो! ऐकून विचित्र वाटेल अशीच आश्चर्यकारक घटना इंडोनेशिया मध्ये घडली आहे.

या दुर्मिळ हवामानाच्या घटनेला "अल्ट्रा लोकलाइज्ड पाऊस" Ultra localized Rain असे म्हणतात. याविषयी बोलताना चित्रीकरन करणारा व्यक्ती म्हणाला, सुरुवातीला मला वाटले की कोणीतरी हॉटेलच्या वर पाण्याशी खेळत आहे. पण जेव्हा मी वर पाहीले तेव्हा खरोखरच आकाशातून पाणी कोसळत होते. पाऊस पडत होता. बेकासी रीजन्सी प्रादेशिक प्रतिनिधीगृहाचे सदस्य असलेले उरयन हा प्रकार पाहण्यासाठी त्या भिजलेल्या कारजवळ गेले, पण त्यांना कोणी तेथे मुद्दाम पाणी फवारत आहे असे दिसून आले नाही.

इंडोनेशियामध्ये (Indonesia) 2017 मध्येही अशीच एक घटना घडली होती, जिथे दक्षिण जकार्तामधील Jakarta एकाच घरावर पाऊस पडला होता. 2016 मध्ये इटलीतील पालेर्मो येथेही अल्ट्रा लोकलाइज्ड पावसाची नोंद झाली आहे. त्या वेळी तो प्रकार पाहून रस्त्याच्या कडेला झालेल्या पावसाने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना धक्का बसला होता.

इंडोनेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देश जसे की मलेशिया, फिलीपिन्स आणि थायलंड हे उष्णकटिबंधीय मान्सून पावसाळी हंगामाच्या शिखरावर आहेत. 35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणारे तापमान अनेकदा मेघगर्जना, विजांचा कडकडाट, पाऊस आणि अचानक पूर यांसह शक्तिशाली उष्णकटिबंधीय वादळे येतात.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT