Heat Wave Schools closed In Bihar ani
देश विदेश

Heat Wave: सूर्य कोपला! ८ जूनपर्यंत सर्व शाळांना सुट्टी; नितीश कुमारांनी फिरवला शिक्षण विभागाचा निर्णय

Heat Wave Schools closed In Bihar: उष्णतेमुळे बेगुसराय आणि शेखपुरा येथे शाळकरी विद्यार्थ्यांची तब्येत खालवली होती. त्यानंतर मुख्य सचिवांनी शाळांच्या वेळेत बदल केला. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शिक्षण विभागाचा निर्णय बदलला.

Bharat Jadhav

संपूर्ण उत्तर भारत कडक उन्हाचा झळा सोसाव्या लागत आहेत. मैदानी भागात उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक हैरान झालेत.तेथील तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचल्याने लोकांना घरातच राहावे लागत आहे. या उन्हाळ्यात शाळकरी मुलांचे सर्वाधिक हाल होत आहेत. वाढलेल्या तापमानाने नागरिक हैरान झालेत. बिहारमधील शेखपुरा आणि बेगुसरायमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांना उन्ह्याच्या झळा लागल्याने त्यांची तब्येत खालवली होती.

उन्हाचा कडाका वाढलेला असताना सुद्धा सरकार शाळांना सु्ट्टी का देत नाही असा प्रश्न नागरिक करत आहेत. विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळा लागल्याने तब्येत खालवल्याचे वृत्त मीडियात आल्यानंतर सरकार आणि प्रशासनाची झोप उडालीय. आधी शाळांच्या वेळा बदलण्याचे आदेश देण्यात आलेत. आता नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने शाळा बंद करण्याचे आदेश जारी केलेत.

बिहारच्या शिक्षण विभागाने सर्वप्रथम शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा केली, परंतु नंतर मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांनी केके पाठक यांचा आदेश बदलत शाळांना सुट्ट्या दिल्यात. मे ३० ते ८ जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जारी केलेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्य सचिव ब्रजेश मेहरोत्रा ​​यांना ३० मे ते ८ जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे पत्र पाठवलं.

कडक उन्हातही बिहारच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के के पाठक यांच्या आदेशामुळे बिहारच्या सरकारी शाळा सुरू होत्या. बिहारमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. बेगुसराय आणि शेखपुरा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याचं समोर आल्यानंतर पालकांनी शिक्षण विभाग आणि केके पाठक यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा विचार केला होता, मात्र दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शाळा बंद करण्याचे आदेश देऊन मुलांना दिलासा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

SCROLL FOR NEXT