5-Year-Old Girl Falls From 7th Floor Balcony Saam
देश विदेश

आईला पाहायला बाल्कनीत गेली, ७व्या मजल्यावरून खाली पडली, ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

5-Year-Old Girl Falls From 7th Floor Balcony: आग्रा येथील सातव्या मजल्यावरून पडून ५ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू. परिसरात खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • सातव्या मजल्यावरून पडून ५ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू.

  • आई मॉर्निंग वॉकसाठी गेली होती.

  • चिमुकली आईला पाहण्यासाठी बाल्कनीत गेली आणि खाली पडली.

आग्र्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. अपघातापूर्वी आई मॉर्निंग वॉकसाठी इमारतीखाली गेली होती. आईकडे पाहत चिमुकली बाल्कनी जवळ आली. रेलिंगवरून चढून चिमुकलीनं आईकडे पाहिलं. मात्र, तिचा पाय घसरला आणि ती थेट जमिनीवर कोसळली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले.

रामरघु आनंद फेज - २ ही ८ मजली इमारत आहे. मनोज प्रताप सिंह यांचे कुटुंब ७ व्या मजल्यावर राहत आहे. मनोज कामानिमित्त सौदी अरेबियात राहतो. तो एका रिफायनरीमध्ये अभियंता आहे. तर, मनोजची पत्नी धराणा सिंह एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. दोघांना गोंडस ५ वर्षांची मुलगी आहे. अनाहिता असं मृत मुलीचं नाव आहे. अनाहिताला अडीच वर्षांचा भाऊ देखील आहे.

धराणा नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेली. सकाळी अनाहिताला जाग आली. आईला शोधत चिमुकली बाल्कनीजवळ गेली. रेलिंगवरून आईकडे पाहत असताना चिमुकलीचा तोल गेला. अनाहिता थेट खाली कोसळली. आवाज ऐकून सोसायटीतील लोक घावत बाहेर आले. आईनं मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. तिला धक्का बसला.

या घटनेची माहिती मिळताच सिकंदरा पोलीस आणि फील्ड युनिटच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला. कुटुंबियांनी शवविच्छेदन करण्यासाठी नकार दिला होता. मात्र, पोलिसांनी पुढील तपासासाठी पोस्टमार्टम आवश्यक असल्याचं सांगितलं. एसीपी हरिपर्वत महाडिक यांनी सांगितले की, आई पहाटे फिरायला का गेली? यामागे इतर काही कारण होते का? सर्व बाजूने पोलीस तपास सुरू आहे.

मृत मुलीच्या आईनं सांगितलं की, 'मला वाटलं माझी मुलगी झोपली आहे. बाल्कनीचाही दरवाजा बंद होता. कदाचित उठल्यानंतर तिनं दरवाजा उघडला असावा', असं चिमुकलीच्या आईनं सांगितलं. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज यांच्या गाडीत उद्धव ठाकरे, दुसऱ्या गाडीत आदित्य-अमित ठाकरे; दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र|VIDEO

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

Saturday Horoscope: धनत्रयोदशीला 4 राशींचे भाग्य उजळणार, कामाच्या ठिकाणी बढतीचे योग, वाचा शनिवारचे राशीभविष्य

धक्कादायक! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, १० दिवसात ३ पोलिसांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT