Uttar Pradesh Husband Wife Death Saam Tv
देश विदेश

Shocking: हृदयद्रावक! गरोदर बायकोच्या मृ्त्यूनंतर काही तासांत नवऱ्याने सोडले प्राण, एकाच ठिकाणी दोघांवर अंत्यसंस्कार; नेमकं घडलं काय?

Uttar Pradesh Husband Wife Death: प्रसुतीदरम्यान बायकोचा मृत्यू झाला. निधनाचे वृत्त कळताच नवऱ्याला धक्का बसला. बायकोच्या मृत्यूनंतर काही तासांत नवऱ्याचाही मृत्यू झाला. दोघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात हृदयद्रावक घटना

  • प्रसूतीदरम्यान बायकोचा मृत्यू

  • काही तासांत नवऱ्याचा मृत्यू

  • दोघांच्या मृतदेहावर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. बायकोच्या मृत्यू्च्या काही तासांमध्येच नवऱ्याने देखील प्राण सोडले. प्रसूती वेदनांदरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. हे वृत्त ऐकताच महिलेच्या नवऱ्यालाही धक्का बसला आणि त्याचाही मृत्यू झाला. ही घटना अमेठीच्या जैस पोलिस स्टेशन परिसरातील निखाई येथे घडली. या दोघांच्या मृतदेहावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखाई येथील रहिवासी असलेल्या आकाशने गेल्या वर्षी ज्योतीशी लग्न केले. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. ज्योती गरोदर राहिली. घरामध्ये नवीन पाहुण्याचे आगमन होणार यासाठी दोघेही खूपच खूश होते. डिलिव्हरीसाठी ती माहेरी गेली होती. मंगळवारी सकाळी ज्योतीला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिच्या कुटुंबीयांनी तिला गौरीगंज येथील जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे रायबरेली येथील एम्स रुग्णालयात नेण्यास सांगितले. ज्योतीची प्रकृती खूपच खालावली आणि तिचा मृत झाला.

ज्योतीच्या मृत्यूची बातमी तिच्या सासरच्या कुटुंबीयांना देण्यात आली. हे वृत्त ऐकताच त्यांना मोठा धक्का बसला. ज्योतीचा नवरा आकाशला बायको आणि बाळ गेल्यामुळे मानसिक धक्का बसला. आकाश सतत रडत होता आणि वारंवार म्हणत होता, 'मी ज्योतीशिवाय राहू शकत नाही.' काही तासांतच त्याची तब्येत बिघडली. नातेवाईकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण या धक्क्यात आकाशचाही मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

या घटनेनंतर सकाळी ज्योती आणि आकाश यांच्या मृतदेहावर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. संपूर्ण गाव आणि आसपासच्या परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आकाशचे वडील सत्य प्रकाश यांनी सांगितले की, 'त्यांच्या मुलाचे लग्न गेल्या वर्षीच झाले होते. नवरा- बायको खूप आनंदी होते आणि त्यांनी कधीही कोणाबद्दल तक्रार केली नाही. त्यांच्यावर काय शाप आला हे त्यांना समजत नव्हते. आमचे कुटुंब बाळाचे आगमन होणार असल्याचा आनंद साजरा करण्याची तयारी करत असताना ही घटना घडली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT