Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : हॉटेलात मासे खाण्यासाठी तो पोहचला; ऑर्डरही मिळाली; मासा खायला सुरुवात करताच घडला विचित्र प्रकार, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

एका माणसाने मागवलेला मासा पाहून सगळेच थक्क झालेत.

Ruchika Jadhav

Viral Video : घरी रोजचं जेवण जेवून कंटाळा आल्यावर सर्वच व्यक्ती महिन्यातून एकदा तरी हॉटेलात जेवणाचा आस्वाद घेतात. काही व्यक्तींच्या घरी मांसाहारी जेवण बनत नाही. त्यामुळे त्यांना मांसाहार करण्यासाठी हॉटेलचा पर्याय निवडावा लागतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका हॉटेलचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे. यामध्ये एका माणसाने मागवलेला मासा पाहून सगळेच थक्क झालेत. (Latest Viral Video)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका तरुणाला मासे खाण्याचा मोह झाला. त्यामुळे तो एका आलिशान हॉटेलमध्ये गेला. तिथे आल्यावर त्याने एक फिश डिश ऑर्डर केली. ऑर्डर आली, पोटात भुकेने कावळे ओरडत होते. ऑर्डर येताच त्याने मास्यावर ताव मारायला सुरुवात केली. यावेळी त्याने स्टिक जशी मास्याजवळ नेली तसा मासा जागा झाला.

समोरचा व्यक्ती आपल्याला खाणार आहे हे समजताच त्या मास्याने स्टिक चावायला सुरुवात केली. हे पाहून तो व्यक्ती देखील थक्क झाला. त्याने जेवणासाठी मगवेलेला मासा हा जिवंतच होता. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मासे खाताना तो व्यक्ती खूप आनंदी होता. त्यामुळे तो व्हिडिओ देखील बनवत होता. त्याच्याबरोबर घाडलेला हा प्रकार आता या व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे.

@OTerrifying या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला गेला. मात्र एवढ्या कामी वेळात व्हिडिओला 36 लाखांहून अधिक व्हूव्ज मिळालेत. तर 73 हजारांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत त्या व्यक्तीने लिहिले आहे की, मी मागवलेल्या मास्याने माझी चॉपस्टिकच पकडली.

हा मजेशीर व्हिडिओ पाहून नेटकरी देखील यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. यात एकाने लिहिले आहे की, मासा कमी शिजला आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, हा तर एकदम ताजा मासा आहे. तसेच काहींनी यावर हसण्याचे ईमोजी पोस्ट केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT