How To Buy Fish : हिवाळ्यात मासे खरेदी करताय ? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

पदार्थांची चव ही अगदी हॉटेल सारखी लागावी यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो
How To Buy Fish
How To Buy Fish Saam Tv
Published On

How To Buy Fish : अनेक मासांहरी प्रेमींसाठी मासे म्हटलं की, जीव की प्राण. माशांचे अनेक प्रकार आहेत. पापलेट, बांगडा, रावस, सुरमई, सौंदाळे, हलवा, घोळ, करली असे बरेच मासे आपल्याला रोज पाहायला मिळतात. तर फिश करी, फिश फ्राय, करंदीचं सुकं, पापलेट आमटी, शिंपल्यांची आमटी अशा अनेक प्रकारच्या पदार्थांची चव चाखालया मिळते.

पदार्थांची चव ही अगदी हॉटेल सारखी लागावी यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो परंतु, जर मुख्य घटक चुकला की, पदार्थाची चव बदली जाते. अनेकांना हिवाळ्यात मासे खायला आवडतात. वातावरणातील अनेक बदलांमुळे याबाबत अनेक संभ्रम आहेत. आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत जे रात्री मासे तयार करुन दुसऱ्या दिवशी त्याची चव चाखतात. काहींचे असे देखील म्हणणे आहे की, जितके ताजे मासे तितकीच चव अधिक सुंदर.

बरेच जणांना मासे खाताना त्याची चव लागत नाही कारण खरेदी करताना ते गोठवलेले मासे घेतात. अशावेळी तुम्ही बाजारात गेल्यानंतर मासे कसे खरेदी करायला हवे हे जाणून घ्या.

How To Buy Fish
Kitchen Hacks : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ? 'या' सोप्या टिप्सच्या मदतीने जाणून घ्या

1. माश्याचा डोळा

  • मासे खरेदी (Shopping) करताना ते ताजे आहेत हे ओळखण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचे डोळे.

  • असे म्हणतात की मासा ताजा असेल तर त्याच्या डोळ्यांवर पांढरा थर नसतो. याशिवाय ताज्या माशांचे डोळे चमकदार तसेच लाल आणि सुजलेले असतात. मासे असे नसल्यास मासे शिळे किंवा खराब होऊ शकतात व पदार्थाची चव देखील बदलते.

2. कल्ले तपासा

  • ताजे मासे खरेदी करण्याचा आणि ओळखण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे त्याचे कल्ले तपासणे.

  • तुम्ही मासे (Fish) विकत घेणार असाल, तर माशाचे कल्ले उचलण्याचा प्रयत्न करा. जर कल्ले लाल असतील तर तुम्ही तो मासा विकत घेऊ शकता.

  • काहीवेळा माशांचे कल्ले हे पांढरे असतात. पांढरा असणे म्हणजे मासे खराब किंवा गोठवलेले असू शकतात.

Fish
Fish Canva

3. वास घ्या

  • बऱ्याच जणांना माशांचा वास आवडत नाही, परंतु ताजे मासे खरेदी करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो.

  • मासे विकत घेताना मासळीचा वास येतो, पण मासळीच्या वासासोबत अन्य प्रकारचा वास असल्यास मासे खराब होऊ शकतात, असे म्हणतात. अशा स्थितीत वास घेऊनही तुम्ही मासे खरेदी करू शकता.

How To Buy Fish
Kitchen Hacks : गरम मसाल्यांना कीड लागतेय ? 'या' टिप्स फॉलो करा

4. माशांची त्वचा तपासा

  • हिवाळ्यात ताजे मासे खरेदी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्याची त्वचा तपासणे.

  • बर्फात ठेवलेल्या माशांची त्वचा पांढरी असते. मासे ताजे असल्यास, त्याची त्वचा हलकी लाल/गुलाबी असते आणि त्याचे मांस पूर्णपणे ताजे असते.

  • कातडे स्वतःच बाहेर पडत असल्यास मासे खरेदी करणे टाळा.

5. या टिप्स देखील फॉलो करा

  • असे म्हणतात की जो मासा शिळा असतो तो सैल असतो आणि जो ताजा असतो तो घट्ट असतो.

  • ताज्या माशाचे तुकडे केल्यावर ते आतून पूर्णपणे लाल/गुलाबी असते. गोठवलेले मासे खराब होतात किंवा पांढरे पडतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com