Rahul Gandhi Meets Hathras Stampedes Victims Family Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi Video: काळजी करू नका, आम्ही आहोत; राहुल गांधींनी हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेत दिला धीर

Priya More

काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज हाथरस दुर्घटनेतील (Hathras Stampede) पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी अलिगड येथील पिलखना गावामध्ये जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. राहुल गांधी हे मंजू देवी यांच्या घरी पोहचले. मंजू देवी यांचा पती छोटे लाल आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हाथसर दुर्घटनेत मंजू देवी यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला होता. राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राहुल गांधी एका खुर्चीवर बसले आहे. पीडित कुटुंबीयांशी चर्चा करत असल्याचे दिसत आहे. ही दुर्घटना नेमकी कशी झाली हे पीडित कुटुंबीय राहुल गांधी यांना सांगत आहेत. यावेळी पीडित कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळाले. राहुल गांधींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांनी यावेळी पीडित कुटुंबीयांना धीर देत काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगितले.

राहुल गांधींच्या भेटीनंतर पीडित कुटुंबातील एका सदस्याने माध्यमांना सांगितले की, 'राहुल गांधी यांनी आम्हाला त्यांच्या पक्षाद्वारे मदत करू असे सांगितले. आणखी काय मदत करणार हे त्यांनी नाही सांगितले. त्यांनी आम्हाला नेमकी घटना कशी घडली याबद्दल विचारले. ही घटना घडली त्यावेळी प्रशासन घटनास्थळी नव्हते का? असा प्रश्न देखील त्यांनी आम्हाला विचारला.' राहुल गांधी यांचा अलिगड येथील दौरा लक्षात घेता पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीडित कुटुंबीयांच्या घरी जाण्यासाठी राहुल गांधी चालत गेले. गावकऱ्यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांनी यावेळी गावकऱ्यांशी देखील गप्पा मारल्या.

काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधीचा हाथसर दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, 'आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १०० हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.' दरम्यान, २ जुलै रोजी हाथरसमध्ये सत्संगमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेमध्ये १२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी ६ दोषींना अटक करण्यात आले आहे. मुख्य आरोपीच्या अटकेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी १ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Papaya Face Pack : पपईपासून बनलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा; स्किनवरील डाग चुटकीसरशी होतील गायब

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT