Mukesh Ambani: मोठी बातमी! मुकेश अंबानींनी घेतली राहुल गांधी यांची भेट, भेटीमागचं कारण काय?

Mukesh Ambani Meets Rahul Gandhi: मुंकेश अंबानी यांनी दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीमागे नेमकं काय कारण आहे, हे जाणून घेऊ...
मोठी बातमी! मुकेश अंबानींनी घेतली राहुल गांधी यांची भेट, भेटीमागचं कारण काय?
Mukesh Ambani Meets Rahul GandhiSaam Tv

एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुंकेश अंबानी यांनी गुरुवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नाही, असं सांगण्यात येत आहे. तर मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. यासाठी स्वतः मुकेश अंबानी देशातील बड्या व्यतींची भेट घेऊन त्यांना आमंत्रित करत आहेत. यासाठीच त्यांनी आज दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

त्यांनी आज दिल्लीत राहुल गांधी यांना त्यांच्या मुलाच्या लग्नात येण्याचे निमंत्रण दिले. ते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांची भेट घेतली.

मोठी बातमी! मुकेश अंबानींनी घेतली राहुल गांधी यांची भेट, भेटीमागचं कारण काय?
Hemant Soren Oath : हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री! जिथून अटक झाली, तिथेच १५६ दिवसांनी घेतली शपथ

दरम्यान, मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे १२ जुलै रोजी लग्न होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा मुंबईतील अंबानी निवासस्थान असलेल्या अँटिलिया येथे सुरू झाला आहे. अँटिलियात होणाऱ्या या लग्न सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहतील, असं बोललं जात आहे.

मोठी बातमी! मुकेश अंबानींनी घेतली राहुल गांधी यांची भेट, भेटीमागचं कारण काय?
Amazon Founder Jeff Bezos : Jeff Bezos होणार मालामाल; एका झटक्यात जमा होणार ५ अरब डॉलर्स, कसं ते जाणून घ्या?

अंबानी कुटुंबियांच्या या खास प्रसंगी देशभरातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा कार्यक्रम आणखी भव्य होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com