Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव लोडरची टेम्पोला धडक, तरूण क्रिकेटपटूसह ४ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये भरधाव लोडरने टेम्पोला धडक दिली. या अपघातामध्ये क्रिकेटपटूसह ४ जणांचा मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले.

Priya More

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. आग्रा-अलिगढ महामार्गावर गुरूवारी रात्री भरधाव लोडरने टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १५ वर्षांच्या क्रिकेटपटूचा समावेश आहे. तसंच दिल्लीत राहणाऱ्या पती-पत्नीचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये ३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मृत्यू झालेल्या दाम्पत्याच्या दोन मुलांचा समावेश आहे. सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अलिगढ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

दिल्लीतील जहांगीरपुरीचे रहिवासी असलेले ओंकार (५० वर्षे) गुरुवारी त्यांची पत्नी विनीता (३५ वर्षे), १८ वर्षीय मुलगी प्रियांका आणि ११ वर्षीय मुलगा लक्ष्य यांच्यासह अलीगढला आले होते. ते भाच्याच्या लग्नासाठी जात होते. अलिगढवरून ते सर्व जण एका टेम्पोत बसून हाथरसच्या दिशेने जात होते. वाटेत इतर प्रवासी देखील या टेम्पोत बसले. या टेम्पोतून ७ जण प्रवास करत होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आग्रा-अलीगढ महामार्गावरील नागला भुरा गावाजवळील राधिका ढाब्याजवळ टेम्पोला अपघात झाला. हाथरसहून भरधाव वेगाने येणाऱ्या एका लोडरने टेम्पोला समोरून धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोच्या पुढील भागाचा चुराडा झाला. लोडरने धडक दिल्यानंतर टेम्पोतील प्रवासी बाहेर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. टेम्पोमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मृत्यू झालेल्या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामध्ये मृत्यू झालेला अश्वनी कुशवाहा हा क्रिकेटर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वरळी युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Delimitation Bill: मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Plastic Containers Vastu: किचनमध्ये प्लास्टिकच्या डब्यांचा खच पडलाय? वास्तूशास्त्रात सांगितलेत योग्य नियम

Winter Health : हिवाळ्यात रोज खा मेथी-सुंठाचा १ लाडू! शरीराला मिळेल ऊर्जा, जाणून घ्या रेसिपी

Hair Care Tips: केस धुण्यासाठी साधं पाणी वापरायचं की थंड? 'ही' एक चूक टाळा; तज्ज्ञांचा मोठा सल्ला

SCROLL FOR NEXT