Haryana Politics  Saam Digital
देश विदेश

Haryana Politics : मोठी बातमी! हरियाणात संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा, भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार का?

Manohar Lal Khattar : लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपशी फिस्कटल्यानंतर हरियाणात मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळानेही राज्यपालांकडे राजीना दिल्याची बातमी आहे.

Sandeep Gawade

Haryana Politics

लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपशी फिस्कटल्यानंतर हरियाणात मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळानेही राज्यपालांकडे राजीना दिल्याची बातमी आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हरियाणामध्ये आता भाजप स्वबळावर सरकार बनवण्याच्या तयारीत आहे.

मनोहर लाल खट्टर यांनी काही अपक्ष आमदारांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर राजभवनाकडे रवाना झाले. महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गाडीत गृहमंत्री अनिल विजही उपस्थित होते. यावेळी विज यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. भाजपच स्वबळावर सरकार बनवण्यात यशस्वी झालं तर विज हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथ ग्रहण समारंभ आजच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजभवनात त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. सायंकाळा ५ पर्यंत शपथग्रहण समारोह पार पडण्याची शक्यता आहे.

मनोहर लाल खट्टरच असणार मुख्यमंत्री?

हरियाणाचे नवे मुख्यमंत्री दुपारी एक वाजता शपथ घेणार असून हा सोहळा राजभवनात पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि तरुण चुग हे निरीक्षक म्हणून चंदीगड विमानतळावर पोहोचले आहेत. या सर्वांचे विमानतळावर राज्यसभा खासदार सुभाष बराला यांनी स्वागत केलं. दरम्यान माजी शिक्षण मंत्री कंवरपाल गुर्जर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, सध्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हेच असतील. माजी कॅबिनेट मंत्री मूलचंद यांनीही मुख्यमंत्रीपदी मनोहर लाल खट्टर कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT