Who is Vasant More: मनसेला जयमहाराष्ट्र करणारे वसंत मोरे आहेत तरी कोण? वाचा राजकीय कारकीर्द

Know About Pune's Ex-MNS Cheif Vasant More: आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी याबाबत माहिती दिली. आता मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? याबाबत जाणून घेऊ.
Know About Pune's Ex-MNS Cheif Vasant More
Know About Pune's Ex-MNS Cheif Vasant MoreSaam TV
Published On

Vasant More Political Career :

लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा रामराम ठोकलाय. आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी याबाबत माहिती दिली. आता मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? याबाबत जाणून घेऊ.

Know About Pune's Ex-MNS Cheif Vasant More
Vasant More Resign Reason: आधी राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत, नंतर फेसबुक पोस्ट; वसंत मोरेंनी सांगितलं मनसे सोडण्याचं कारण

कोण आहेत वसंत मोरे?

आतापर्यंत एक कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरेंची ओळख होती. राज ठाकरेंच्या विश्वासून कार्यकर्त्यांच्या यादीत ते अव्वल स्थानी होते. राज ठाकरेंनी मशिदीच्या भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. राज्यात हा मुद्दा तापला होता तेव्हा वसंत मोरे हे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं.

बालपण (Vasant More's School Life)

१० ऑक्टोबर १९७५ रोजी पुण्यात वसंत मोरे यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण पुण्यातच गेले. कात्रजमधील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून वसंत मोरे यांनी आपल्या शालेय शिक्षणाला सुरूवात केली. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी शाहू मंदिर महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी आपल्या शेती व्यवसायाला सुरूवात केली.

वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द

गेली २९ वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेत आहेत.

२००६ साली राज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी मनसेच्या स्थापनेवेळी पक्षात प्रवेश केला.

साल २००७ मध्ये झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ८ नगरसेवक निवडून आणले. या विजयात वसंत मोरेंचा मोलाचा मोठा वाटा होता.

पुढे साल २०१२ च्या पुणे मनपा निवडणुकीत वसंत मोरेंनी पुन्हा बाजी मारली होती.

साल २०१७ मध्ये वसंत मोरे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले.

२०२१दरम्यान वसंत मोरेंना पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी पुण्याचं शहराध्यक्ष पद दिलं.

वसंत मोरे यांनी मनसे का सोडली?

"पक्षामधील अंतर्गत गोष्टीवरून मी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय. मी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होतो. त्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे माझं नावही सूचवलं होतं. मात्र, वारंवार गैरसमज पसवून माझ्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे, असं वसंत मोरे यांनी स्वत: माध्यामांशी संवाद साधताना सांगितलं आहे.

Know About Pune's Ex-MNS Cheif Vasant More
Vasant More Resign: ब्रेकिंग! वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र; लोकसभेच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com