Vasant More Resign: ब्रेकिंग! वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र; लोकसभेच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का

Vasant More Left MNS: राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी. मनसे नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. फेसबूक पोस्ट करत त्यांनी पक्ष सोडल्याची माहिती दिली आहे.
Pune MNS Chief  Vasant More Left From  Raj Thackeray's MNS
Pune MNS Chief Vasant More Left From Raj Thackeray's MNSSaamtv
Published On

MNS Vasant More Resign News:

राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी. लोकसभेच्या तोंडावर मनसे नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. फेसबूक पोस्ट करत त्यांनी पक्ष सोडल्याची माहिती दिली आहे. लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra Loksabha Election)

काय म्हणालेत वसंत मोरे?

"पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो.

परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षातर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे, असे ते म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune MNS Chief  Vasant More Left From  Raj Thackeray's MNS
Beed : माजलगाव पंचायत समितीवर चिंचगव्हाण गावातील महिलांचा ठिय्या, 'ते' अतिक्रमण हटविण्याची मागणी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे (Vasant More) हे पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा होती. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) सोडणार असल्याचे बोलले जात होते. आज सकाळीच त्यांनी फेसबूक पोस्ट करत तसे संकेत दिले होते. अखेर त्यांनी आज पक्षाला रामराम ठोकला असून ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

Pune MNS Chief  Vasant More Left From  Raj Thackeray's MNS
Maharashtra Politics: CAA वरुन सामना! इथे ही यु-टर्न घेणार की काय? भाजपचा ठाकरे गटाला खोचक सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com