Haryana police video
Haryana police video  Saam tv
देश विदेश

Bhiwani Police Bribe Case: महिला पोलीस अधिकाऱ्याला ५ हजारांची लाच घेणं पडलं महागात; कारवाईचा व्हिडिओ आला समोर

साम टिव्ही ब्युरो

Haryana Police Video: हरियाणामधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने ५ हजारांची लाच घेतल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. हरियाणामधील भिवानी भागातील ही घटना घडली आहे. भिवानीमधील बवानीखेडी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

बवानीखेडी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेची तक्रार होती. या महिलेला एका व्यक्तीकडून पैसे वसूल करायचे होते. यामुळे पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांनी या तक्रारदार महिलेकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर या महिलेने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांच्या विरोधात तक्रार दिली.

तक्रारदार महिलेच्या तक्रारीनंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुन्नी देवी यांना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर मुन्नी देवी यांना या पथकांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांच्यावर कारवाई केल्यानंतर तीन तासांनतर हे प्रकरण प्रसारमाध्यमांवर आलं.

हरियाणातील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ट्विट करत ही माहिती दिली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ट्विट करत म्हटले की, 'काल हिसार उर्फ भवानी येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बवानीखेडी पोलीस (Police) स्टेशनमधील महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं'.

'या महिला पोलीस अधिकारी मुन्नी देवी यांना स्वातंत्र्य दिनाला चांगलं आणि प्रामाणिक कामांसाठी गौरवण्यात आलं होतं, असंही त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एका युजरने म्हटले आहे की, तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. देशातील भ्रष्टाचार संपुष्टात आला तर ८० टक्के समस्या नाहीशा होतील'. तर अनेक युजर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाईचे कौतुक करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

SCROLL FOR NEXT