Hospital/file Photos Saam tv
देश विदेश

Haryana News: हरियाणाच्या नूंहमध्ये वायू गळती, 24 कामगारांची प्रकृती खालावली, उपचार सुरु

Haryana News: हरियाणाच्या नूंह जिल्ह्यात मांडीखेडा गावात एका मांसाच्या फॅक्ट्रीमध्ये नायट्रोजन गॅसची गळती झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Haryana News:

हरियाणाच्या नूंह जिल्ह्यात मांडीखेडा गावात एका मांसाच्या फॅक्ट्रीमध्ये नायट्रोजन गॅसची गळती झाल्याची घटना घडली आहे. नायट्रोजन वायू गळती होताच फॅक्ट्रीमधील २४ कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कामगारांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, हरियाणाच्या मांडीखेडा गावाजवळील १ किलोमीटर अंतरावर असलेल्या एलेना मांस फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये नायट्रोजन गॅस लीक झाल्याची घटना घडली आहे. वायू गळती झाल्यामुळे कामगारांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. फॅक्ट्रीमध्ये श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने कामगारांना जवळच्या आफिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एलेना मांस फॅक्ट्रीमध्ये वायू गळती झाल्याच्या घटनेची पूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही. या घटनेची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. नूंह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मांस फॅक्ट्री आहेत.

उत्तर प्रदेशच्या मांस फॅक्ट्रीतही झाली होती वायू गळती

तत्पूर्वी, उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील मांस फॅक्ट्रीतही वायू गळतीची दुर्घटना घडली होती. या फॅक्ट्रीमध्ये विषारी वायूमुळे १०० हून अधिक कर्मचारी बेशुद्ध झाले होते. तर बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही सामावेश होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जैन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar: भाजपकडून शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याच्या मुलासह १५०० कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Maharashtra Live News Update : शिंदे सेनेच्या आमदारांचा मोठा निर्णय; VSR कंपनीचं विमान वापरणार नाही

Khapravarchi Puranpoli: यंदा होळीला बनवा खानदेशी स्टाईल खापरावरची पुरणपोळी, रेसिपी वाचा

Black Neck Tips: काळी मान स्वच्छ कशी करायची?

Gold Rate Today : होळीआधी गूड न्यूज! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर कोसळले; वाचा 24K, 22K आणि 18K गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT