Bus Accident at Toll booth Saam Tv
देश विदेश

Bus Accident : बसने टोल बूथच्या कर्मचाऱ्याला चिरडलं, टोल टाळण्यासाठी पळ काढला; पाहा थरारक व्हिडीओ

Toll Booth Accident : टोलचे पैसे भरावे लागू नये यासाठी बसचालकाने बस वेगाने चालवली. तेव्हा पुढे उभ्या असलेल्या टोल बूथच्या कर्मचाऱ्याला बसने चिरडले. हा अपघात तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

Yash Shirke

Haryaana Toll Booth Accident : हरियाणाच्या गुरुग्राम येथील एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका बसने टोल बूथवरील कर्मचाऱ्याला चिरडून पुढे जात असल्याचे पाहायला मिळते. ही घटना गुरुग्रामच्या सोहना रोडवरील घमरोज टोल बूथवर घडल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक चारचाकी कार उभी असल्याचे दिसते. टोल बूथचेो कर्मचारी गाडीतील लोकांशी वाद घातल असल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर कारचालक त्याच्या कारमध्ये बसतो आणि तेथून निघून जातो. याचा फायदा कारच्या मागे असलेला बसचालक घेतो.

टोल बूथवरुन कार निघताच तिच्या मागे असलेल्या बसचा चालक परिस्थितीचा फायदा घेतो आणि बस पुढे नेत टोल बूथवरुन निघून जातो. पळून जाण्याच्या प्रयत्नांमध्ये वेगाने जात असणारी बस बूथवर काम करणाऱ्या एका कर्मचारी धडक देते. जोरात बसचा धक्का लागल्याने टोल बूथ कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुग्राम पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. टोल भरावा लागू नये यासाठी बसचालकाने पळण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा हा अपघात झाला असे म्हटले जात आहे. या बसचालकाला अटक झाली की नाही हे देखील अस्पष्ट आहे. दरम्यान या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT