Outrage at Haryana’s MDU University after a woman worker was humiliated for seeking a period break. Canva
देश विदेश

Haryana University: सर, ब्रेक हवा; पीरियड्स आलेल्या महिलेला काढायला लावले कपडे, विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

Haryana University Woman Worker: महिला सफाई कर्मचाऱ्यांनी आरोप केला की त्या त्यांना मासिक पाळीमुळे त्रास होत होता. त्यामुळे त्या ब्रेक घेत होत्या, त्यासाठी त्यांनी पर्यवेक्षकांना ब्रेकची विचारणा केली.

Bharat Jadhav

  • हरियाणातील एमडीयू विद्यापीठात महिला कर्मचाऱ्याचा अपमान.

  • मासिक पाळीमुळे ब्रेक मागितल्यावर पर्यवेक्षकाने काढायला लावले कपडे

  • प्रशासनाने तात्काळ कारवाई करत पर्यवेक्षकाला नोकरीवरून काढलं.

हरियाणातील रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात (MDU) मंगळवारी महिला स्वच्छता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. मासिक पाळीमुळे त्रास होत असल्यानं एका महिला सफाई कर्मचारीने आपल्या पर्यवेक्षकांकडे ब्रेक मागितला. मात्र त्यावेळी पर्यवेक्षकानं ब्रेक देण्यास नकार दिला. महिलेला खरंच मासिक पाळी आली आहे का हे तपासण्याचे आदेश दिले. त्यामुळे सफाई कर्मचारी आणि पर्यवेक्षकांमध्ये वाद झाला.

वाद वाढल्यानंतर विद्यार्थी संघटनांनीही स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. तसेच आरोपींना निलंबित करण्याची मागणी केली. हा वाद वाढल्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर दबाव वाढला त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पर्यवेक्षकाला घाईघाईने कर्तव्यावरून काढून टाकले.

कपडे काढून फोटो पाठवा

हरियाणा विद्यापीठातील महिला सफाई कर्मचाऱ्याला मासिक पाळी आल्यानं तिने पर्यवेक्षकाकडे ब्रेक मागितला. मासिक पाळीमुळे त्रास होत असल्यानं महिलेनं ब्रेक मागितला. मात्र पर्यवेक्षकाने सुट्टी देण्याऐवजी महिलेसोबत गैरवर्तन केलं. महिलेची समस्या जाणून घेण्याऐवजी असभ्य वर्तन केलं. पर्यवेक्षकाने एक दुसऱ्या सफाई कर्मचाऱ्याला संबंधित महिलेला खरंच मासिक पाळी आली आहे का हे तपासायला लावले.

इतकेच नाही तर महिलेचे कपडे उतरवून त्याचे फोटो पाठवा असं पर्यवेक्षकाने सांगितलं. त्यावर महिला कर्मचारी संतापली आणि तिने असं काही करण्यास नकार दिला. तेव्हा पर्यवेक्षकाने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप दोन सफाई कर्मचाऱ्यांनी केलाय. दरम्यान पर्यवेक्षकाचे असे वर्तन पाहून महिलांनी आरडाओरड करत पर्यवेक्षकासोबत वाद घातला.

वाद वाढल्यानंतर कुलगुरू केके गुप्ता घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू म्हणाले की, ते याप्रकरणी कठोर कारवाई करतील. संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, यात विद्यापीठात महिलांसोबत झालेल्या कोणत्याही गैरवर्तनाची चौकशी केली जाईल असं कुलसचिव म्हणालेत.

सध्या पर्यवेक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. जर गरज असली तर एससी आणि एसटी अंतर्गत तक्रार दाखल केली जाईल. कोणत्याच महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन सहन केलं जाणार नाही, असं कुलगुरू म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT