Mask Saam TV
देश विदेश

Corona Mask Compulsory: देशात कोरोनाचा धोका वाढला; 'या' 3 राज्यात मास्कसक्ती

Haryana Kerala and Pondicherry Corona Update: कोरोनाने देशामध्ये पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे.

Shivani Tichkule

India Corona Virus News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाने देशामध्ये पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे.  दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

वाढत्या कोरोना (Corona) रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केरळ, हरियाणा आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे.

हरियाणात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता हरियाणा (Haryana) सरकारने खबरदारीचे उपाय करत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही कोरोना प्रोटोकॉल पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केरळ आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य

केरळ (kerala) सरकारने गर्भवती महिला, वृद्ध आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत.

पुद्दुचेरीत सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य

पुद्दुचेरी (Pondicherry) प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. रुग्णालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दारूची दुकाने, मनोरंजन क्षेत्रे, सरकारी कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे आवश्यक आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धाराशिवमध्ये प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात; जीवितहानी नाही

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT