Call Girl Search Turns Costly Saam
देश विदेश

Googleवर शोधली कॉल गर्ल, नंतर हॉटेलवर बोलावून घेतलं अन्.. नेमकं घडलं काय?

Call Girl Search Turns Costly: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एका तरूणाची कॉल गर्लचा नंबर शोधताना मोठी फसवणूक झाली आहे. तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २,३०,८०० रूपये जमा करून घेतले.

Bhagyashree Kamble

हरियाणाच्या फरीदाबादमधील बल्लभगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणाचा गुगलवर कॉल गर्लचा नंबर शोधणं चांगलंच महागात पडलं आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी त्याला सापळ्यात अडकवलं. तसेच २,३०,८०० रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सेक्टर २ येथील रहिवासी तरूणाने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

पीडित तरूणानं दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी तरूण कॉल गर्लचा मोबाईल नंबर शोधत होता. सर्चिंगमध्ये त्याला एक नंबर सापडला. त्या नंबरवर चॅट केल्यानंतर त्याला दुसरा मोबाईल नंबर देण्यात आला. २२ नोव्हेंबरला त्यानं दिलेल्या नंबरवर कॉल केला. तेव्हा आरोपीनं त्याला जुना फरीदाबाद चौकातील एका हॉटेलमध्ये बोलावले.

आरोपीनं तरूणाला आणखी एक व्हॉट्सअॅप नंबर दिला. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्या तरूणानं दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअॅप कॉल केला. आरोपीनं पीडित तरूणाकडून पैसे मागितले. आरोपीनं सर्व्हिस चार्ज, हॉटेल एंट्री फी, पोलीस व्हेरिफिकेशन, जीएसटी आणि इतर शुल्काच्या बहाण्याने तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे मागितले.

पीडित तरूणानं मित्रांच्या मार्फत आरोपीच्या बँक खात्यात पैसे जमा केले. या प्रकरणात तरूण फसला. त्याच्याकडून आरोपीनं २ लाख ३० हजार ८०० रूपये उकळले. या घटनेनंतर पीडित तरूणानं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT