Haryana Election Result  Saam Digital
देश विदेश

Haryana Election Result : हरियाणात काँग्रेसला झटका, महाराष्ट्राच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर

Haryana Election Result Update : काँग्रेस आघाडीला हरियाणा निवडणुकीत ३५ जागा मिळताना दिसत आहेत, तर भाजपने ५० जागांवर आघाडी घेतली आहे. या निकालाचा महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

हरियाणा निवडणुकीचे निकाल सुरू असून भाजप बहुतमताचा आकडा गाठताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसला मात्र फारसा करिष्मा दाखवता आलेला नाही. काँग्रेस आघाडीला केवळ ३५ जागा मिळताना दिसत आहेत, तर भाजपने ५० जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात असून काँग्रेसच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. हरियाणामधील पराभवचा परिणाम आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे.

राजकीयदृष्ट्या उत्तर प्रेदशनंतर महाराष्ट्र देशातील महत्त्वाचं राज्य. त्यामुळे या राज्यांच्या निवडणुकांकडे नेहमीच देशातील जनतेचं लक्ष असतं. मागच्या काही काळात महाराष्ट्रासोबत झारखंडमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्याचा लोकसभेतील निवडणुकांवर परिणाम पहायला मिळाला. मूर्जीतावस्थेत गेलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आणि १०० आसपास जागा मिळाल्या. इंडिया आघाडीला २३५ चा आकडा गाठला आहे. यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेत काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हरियाणात काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींना हरियाणात विजयाचा होता विश्वास

काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीत संपू्र्ण ताकद पणाला लावली होती. हरियाणात मोठा विजय मिळणार असल्याचा दावाही करण्यात आला होता. १० वर्षांनंतर काँग्रेस हरियाणात पुनरागमन करले, अशी चर्चा होती. मात्र, भाजप हॅटट्रीक करत इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकते.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात अनेक वेळा दौरा केला आहे. अनेक सभांना संबोधित केले आहे. भाजपलाही महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत गमवायचं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात यावेळी अत्यंत काट्याची लढत पहायला मिळणार आहे. भाजपला हरियाणामध्ये मिळणाऱ्या विजयामुळे महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही अधिक ताकदीने लढण्याची शक्यता आहे.

झारखंडमध्ये भाजपला विजयाची अपेक्षा

आगामी झारखंड निवडणुकीतही भाजपला मोठी अपेक्षा आहे. हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचाराच्या आरोंपांवरून अटक झाली. राज्यात हिंदूंवर हल्ले झाले, लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आदिवासी गावांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली आहे, त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भाजप या निवडणुकीत याच मुद्द्यांना धरून पूर्ण ताकदीने प्रचार करण्याची शक्यता आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे वाढले आहेत. एकदा सत्ता हातातून गेली की झारखंडमध्ये पुन्हा सत्ता मिळवणं अवघड आहे. त्यामुळे भाजपला यावेळी झारखंडमध्ये विजयाच्या अपेक्षा आहेत. कॉंग्रेस मात्र झारखंडमध्ये बऱ्याचअंशी मागे आहे.

राहुल गांधींच्या निवडणूक रणनितीवर उठू शकतात प्रश्न

हरियाणामध्ये यावेळी काँग्रेसच्या विजयाचे दावे करण्यात आले होते. स्वतः राहुल गांधी अत्यंत सक्रिय होते. मात्र, या पराभवामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि हरियाणा काँग्रेस पुन्हा एकदा गटबाजी आणि अंतर्गत संघर्षाचा शिकार होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

हरियाणामध्ये भाजप मागील 10 वर्षांपासून सत्तेत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 90 पैकी 47 जागा जिंकून बहुमताचे सरकार स्थापन केले होते. त्या वेळी इंडियन नॅशनल लोकदलने 19 आणि काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये भाजपने दुष्यंत चौटालांच्या जेजेपी पक्षासोबत सरकार स्थापन केले होते. या निवडणुकीत भाजपला केवळ 40 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा 10 जागा जिंकणाऱ्या जेजेपीसोबत भाजपने आघाडी सरकार स्थापन केले होते. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने 5-5 जागा जिंकल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT