Haryana Crime Saam Tv
देश विदेश

Crime: कोर्टामध्ये गँगस्टरची हत्या, एकापोठापाठ १४ गोळ्या झाडल्या; गोळीबाराने परिसर हादरला

Haryana Crime: हरियाणामध्ये गँगस्टरची निर्घृण हत्या करण्यात आली. कोर्टामध्ये त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. एकापोठापाठ १४ गोळ्या झाडण्यात आल्या.

Priya More
  • हिसार कोर्टात गँगस्टर विनोद काणाची हत्या

  • गोळ्या झाडून जागीच संपवलं

  • हरियाणातील कोर्ट परिसर १४ गोळ्या झाडल्या

  • हिसार कोर्ट गोळीबारानंतर परिसर सील

हरियाणातील कोर्टात गँगस्टरची हत्या करण्यात आली. हिसार येथील कोर्टात गुरूवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. गँगस्टर विनोद काणावर एकापाठोपाठ १४ गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. कोर्टाचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. .

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पावणे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. थुराना गावातील रहिवासी गँगस्टर विनोद काणा याची हत्या करण्यात आली. त्याच्या दिशेने १४ गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. कोर्टात आलेले सर्वजण इकडे तिकडे पळू लागले. पोलिसांनी कोर्टात येणाऱ्यांवर बंदी घातली. कोर्टाच्या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून त्याच्याच मदतीने आरोपींचा शोध घेणार आहे.

गँगगस्टर विनोद काणाला पोलिसांनी कोर्टात हजर करण्यासाठी आणले होते. कोर्टामध्ये प्रवेश करत असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी कानाच्या दिशेने १४ गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे कोर्टाच्या परिसरातील अनेक वाहनांच्या काचा देखील फुटल्या. विनोद काणाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले.

गोळीबारानंतर कोर्टाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. सर्वजण सैरावैरा पळू लागले. विनोद पानू उर्फ काना हा हिसारचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर होता. त्याच्यावर हत्येसह ३१ गुन्हेगारी खटले दाखल आहेत. हिसारमध्ये आमदार सावित्री जिंदाल यांच्या पीएच्या पुतण्याच्या हत्येचाही आरोप त्याच्यावर होता. कोर्टाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT