Haryana breaking News car and truck accident in bhiwani 5 friends and one young dies on the spot  Saam TV
देश विदेश

Accident News: भयंकर! भरधाव ट्रकने कारला उडवलं; भीषण अपघातात ५ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Haryana Car Accident: भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बलेनो कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ५ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

Haryana Car Accident News

भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बलेनो कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ५ जिवलग मित्रांसह ट्रकमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना हरियाणातील भिवानी जिल्ह्यात मंगळवारी (१० ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

प्रदीप (वय 30, रा. लडियानली), रवी (वय 22, रा. इंदिवली गाव), जितेंद्र (वय 30, रा. नारनौंड), विकास (वय 28) आणि नसीब (वय 27, रा. बुडेडा गाव) अशी मृत्युमुखी पडलेल्या मित्रांची नावे आहेत. तर ट्रकमधील क्लिनरची ओळख अद्याप पटलेली नाही.

स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाचही मित्रांचे मृतदेह भिवानी येथील चौधरी बन्सीलाल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच तरुणांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत आक्रोश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवानी जिल्ह्यातील (Haryana Accident News) ५ जिवलग मित्र मंगळवारी पार्टी करण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री उशीरा ते कारने आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी जात होते. यादरम्यान, भिवानी जिल्ह्यातील बहल भागातील सेर्ला गावाजवळ समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत पाचही मित्रांसह ट्रकमधील क्लिनरचाही जागीच मृत्यू झाला. अपघातासंदर्भात बहल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, मृतांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले आहे. ट्रक क्लीनरची ओळख पटलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुणे शहरातील तापमानात वाढ, हवेतील गारवा झाला कमी

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT