Maharashtra Politics: पुढची तारीख देऊ शकलो असतो, पण... आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

Rahul Narvekar on Mla Disqualification Case: लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी एक दिवस आधी सुनावणी घेणार आहे, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.
maharashtra assembly speaker Rahul Narvekar Reaction on Shiv Sena Mla Disqualification Case
maharashtra assembly speaker Rahul Narvekar Reaction on Shiv Sena Mla Disqualification CaseSaam Tv
Published On

Rahul Narvekar on Shivsena Mla Disqualification Case

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला वेग दिला आहे. १३ ऑक्टोबरला होणारी सुनावणी एक दिवस आधी म्हणजेच १२ ऑक्टोबरला घेण्याचं राहुल नार्वेकर यांनी ठरवलं आहे. याबाबत ठाकरे आणि शिंदे गटाला ईमेलद्वारे माहिती देखील देण्यात आली आहे. दरम्यान, सुनावणी ठरलेल्या वेळेच्या आधीच का घेण्यात येतेय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. (Latest Marathi News)

maharashtra assembly speaker Rahul Narvekar Reaction on Shiv Sena Mla Disqualification Case
Political News: मान डोलावणारे नंदीबैल आम्ही तुमच्याकडेच सोडून आलोय; शीतल म्हात्रेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

याबाबत स्वत: राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जी 20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी एक दिवस आधी घेणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.

१३ ऑक्टोबर रोजी मला दिल्लीतील एका कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आहे. मी या कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे मी १३ तारखेची सुनावणी १२ तारखेला घेत आहे. मला यात कोणतीही दिरंगाई करायची नाहीये. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी एक दिवस आधी सुनावणी घेणार आहे, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.

दरम्यान, राहुल नार्वेकर आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला जाणून बुजून दिरंगाई करत आहेत, असा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. या आरोपाला देखील नार्वेकरांनी उत्तर दिलं आहे. जर मला दिरंगाईच करायची असती, तर या कारणास्तव मी ती पुढे ढकलू शकलो असतो, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

असे असतानाही मी एक दिवस आधी सुनावणी घेत आहे. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमागचा हेतू मला माहिती आहे. पण यामुळे माझ्या निर्णयप्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना कदाचित या या संपूर्ण निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकायचा असेल. पण याचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडू शकत नाही. नियमानुसार मी माझा निर्णय घेईन, असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलंय.

maharashtra assembly speaker Rahul Narvekar Reaction on Shiv Sena Mla Disqualification Case
Shivsena News: उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह परत मिळणार? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com