haryana election  Saam TV
देश विदेश

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

haryana election polling percentage : हरियाणा विधानसभेसाठी मतदान पार पडलं आहे. यंदा हरियाणात भाजप की काँग्रेस झेंडा फडकवणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान पार पडलं आहे. तर जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी काही दिवसाआधी तीन टप्प्यात मतदान झालं आहे. या दोन्ही राज्यातील मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले होते. या दोन्ही राज्यातील मतदानाची मतमोजणी ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हरियाणाच्या ९० विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि काँग्रेसच्या विनेश फोगट, जेजेपीचे दुष्यंत चौटा यांच्यासहित १०३१ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या हरियाणा विधानसभा निवडणुकीत ४६४ अपक्ष उमेदवार रिंगणात होते.

हरियाणात २ कोटींहून अधिक मतदार आहेत. भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर काँग्रेसला एका दशकानंतर पुन्हा सत्ता मिळवण्याची आशा आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, आप, इनेलो-बसपा आणि जेजेपी-आझाद समाज पार्टीने सहभाग नोंदवला आहे.

हरियाणा निवडणुकीसाठी सांयकाळी ५ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान झालं आहे. तर हरियाणात ३ वाजेपर्यंत ४९.१३ टक्के मतदान झालं होतं. ३ वाजता मेवात मतदारसंघात सर्वाधिक ५६.५९ टक्के मतदान झालं होतं.

दरम्यान, हरियाणाच्या ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी आलेली नाही. तर मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे देखील आले आहेत. अनेक एक्झिट पोलमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पुन्हा रिटर्न येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर भाजपला सत्ता गमावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Pawar vs Pawar: पवार कधीच एक होणार नाहीत? वैयक्तिक नव्हे वैचारिक मतभेद: शरद पवार

Horoscope: काही राशींना लागेल लॉटरी तर काहींची होईल खटपट; जाणून घ्या कसा असेल शुक्रवारचा दिवस

SCROLL FOR NEXT