Haryana Assembly Election Result Live Updates:  Saam tv
देश विदेश

Vinesh Phogat News: 'धाकड गर्ल'ने विधानसभेचे मैदान मारलं; विनेश फोगाटचा दणदणीत विजय; भाजपला धोबीपछाड

Haryana Assembly Election Result Live Updates: कुस्तीच्या मैदानातून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे.

Gangappa Pujari

Vinesh Phogat Won: कुस्तीच्या मैदानातून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवलेल्या विनेश फोगाटने ५७६१ मतांनी दणदणीत विजय मिळवला. तिने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार योगेश बैरागीला चितपट केले.

हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत या विधानसभा निवडणुकीत जुलाना विधानसभेची जागा सुरुवातीपासूनच राज्यातील सर्वात चर्चेत जागांपैकी एक होती. या जागेवर काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगट यांना तिकीट देऊन भाजपला शह देण्यासाठी मोठी खेळी केली होती. त्याचवेळी दलित चेहरा असलेल्या कॅप्टन योगेश बैरागी यांना भाजपने तिकीट दिले होते. या रोमहर्षक लढतीत अखेर आता विनिश फोगाटने बाजी मारली आहे.

जुलाना विधानसभा मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगट विजयी झाल्या आहेत.मतमोजणीच्या १५ फेऱ्यांनंतर त्यांनी भाजपच्या योगेश कुमार यांचा ५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. ही जागा जिंद जिल्ह्यातील 5 विधानसभा जागांपैकी एक आहे. 1967 च्या हद्दवाढीनंतर अस्तित्वात आलेली ही जागा गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोघांसाठी अवघड होती.

२०१९ च्या निवडणुकीत जननायक जनता पक्षाने (जेजेपी) ही जागा जिंकली होती. जेजेपीच्या अमरजीत धांडा यांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या परमिंदर सिंग धुल यांचा पराभव केला. दोघांमध्ये सुमारे 24 हजार मतांचा फरक होता, तर काँग्रेसचे धर्मेंद्र सिंह धुल यांना 12,440 मते मिळाली. त्याचवेळी भाजपला या जागेवर पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT