PM Modi, Amit Shah Celebration Saam Tv
देश विदेश

Haryana Election Result: भाजपाचं अशक्य ते शक्य! हरियाणात भाजपची हॅट्ट्रिक; BJP ला 48, काँग्रेसला किती मिळाल्या जागा?

Haryana Election Analysis : हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झालंय... हरियाणात भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 34 जागांवर तर इतर पक्ष 6 ठिकाणी आघाडीवर आहे. मात्र भाजपनं हा करिष्मा कसा करुन दाखवला.

Tanmay Tillu

हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल्स आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलंय. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेलं नाही. मात्र भाजपनं ही किमया साधत हॅटट्रिक साजरी केलीये.

कोणाला किती मिळालेल्या जागा?

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 48 जागा मिळालेल्या आहेत. तर मुख्य विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तसेच आयएनडीला 3 आणि आयएनएलडीला 2 जागा मिळालेल्या आहेत.

कुस्तीपटू आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी देशव्यापी नाचक्की झाल्यामुळे हरियाणातील परिस्थिती भाजपसाठी प्रतिकूल मानली जात होती. मात्र, ही सगळी आव्हानं झुगारत भाजपनं सत्ता राखत हॅट्ट्रिक साधलीये. हिंदी पट्ट्यातील हरियाणात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानं भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील निराशेचे मळभ दूर झालंय. भाजपच्या विजयाची कारणं काय आहेत, हे जाणून घेऊ...

भाजपच्या विजयाची कारणं

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी, कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं प्रतिकूल वातावरण परतून लावण्यात यश आलं आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलला होता. मनोहरलाल खट्टरांऐवजी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केलं. जाट मतदार वगळून ओबीसींची मोट बांधण्याची रणनीती यशस्वी ठरली. काँग्रेसमधील हुड्डा आणि कुमारी शैलजांमधील अंतर्गत गटबाजीचा फायदाही या निवडणुकीत भाजपला मिळाला.

दुसरीकडे अनुकूल परिस्थिती असताना काँग्रेसला आलेले अपयश चर्चेचा विषय ठरणार आहे. हरियाणातील अपयशामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित होणार आहे. हरियाणातील काँग्रेसचा पक्षातंर्गत संघर्ष पराभवासाठी कारण ठरला का याचं चिंतन काँग्रेसला करावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुजरात एटीएसची मोठी कारवाई; 500 किलो ड्रग्स जप्त, इरानी बोटीतून होत होती तस्करी

Dolly Chaiwala: भाजपच्या प्रचारात डॉली चायवाल्याची झापूक- झुपूक एन्ट्री; Photos पाहा

Best Sunset Places: ऐन थंडीत निर्सगाच्या सानिध्यात तुम्हालाही sunset चा आनंद घ्यायचाय, तर मुबंईजवळील या स्थळांना नक्की भेट द्या

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

SCROLL FOR NEXT