Maharashtra Politics  Saam Tv
देश विदेश

Haryana- Jammu Kashmir Election Result: हरियाणात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसला जम्मूमध्ये यश; महाराष्ट्रातील नेते काय म्हणाले?

Haryana- Jammu Kashmir Assembly Election: हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये कोणता पक्ष सर्वाधिक जागांवर विजयी होत सरकार स्थापन करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Priya More

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक ९० जागांचे निकाल आज जाही होणार आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकालाचे १ वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडी ४९, भाजप २९, पीडीपी २ ३णि इतर ९ जागांवर आघाडीवर आहे. जम्मू काश्मीरमध्ये कोणता पक्ष सर्वाधिक जागांवर विजयी होत सरकार स्थापन करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हरियाणा विधानसभा निवडणूक निकालाचे १ वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, काँग्रेस+ ३४, भाजप ५१, आयईएनएलडी २ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहे. या दोन्ही राज्याच्या निकालाकडे सर्वांचेलक्ष लागल आहेत.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हरियाणा विधानसभा निवडूक निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'हरियाणा 70 जागा काँग्रेसला येणार हे सगळेच सर्वे सांगत होते. जनतेचे मत ईव्हीएममध्ये बदलत असेल अशी चर्चा जनतेत सुरू आहे. ईव्हीएम मशीनवर आमचा आरोप नाही. मात्र जनतेमध्ये सर्वेच्या माध्यमातून समोर आलं होतं त्यावर देखील दुर्लक्ष करता येणार नाही. अजून मतमोजणी सुरू आहे आम्हाला आशा आहे की आम्ही हरियाणाच सरकार स्थापन करू. हरियाणा शेतकरी, तरुण, विविध जाती-धर्माचे लोकं नाराज होते आणि तेच सर्वेमध्ये दिसून आलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे मुख्यमंत्री सैनिक हे सांगत होते की सर्वेच्या विपरीत निकाल लागतील आणि मग विरोधी पक्ष ईव्हीएमवरती बोट दाखवेल. वरती त्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते एवढ्या स्पष्टपणे कसं बोलू शकतात. ईव्हीएम बद्दलची शंका भाजपनेच निर्माण केली. कलम ३७० हटवल्यानंतर आतंकवाद संपेल या भाजपच्या घोषणा फोल ठरल्या. जम्मू असेल लडाख असेल त्यात देखील काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मुसंडी मारली आहे.'

प्रसाद लाड यांनी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'देशातील दोन राज्यात निवडणूक झाली. हरियाणामधील आकडेवारी ही मोदी यांच्या विकासामुळे आहे. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही ३० जागेपर्यंत पोहचलो आहोत. भाजप ५२ जागेवर पुढे आहे. हरियाणामध्ये काँग्रेसने जो आरोप केला आहे तो जम्मूत ही करायला हवा होता. काँग्रेस राडीचा डाव करत आहे. हरियाणासारखे सरकार महाराष्ट्रात आहे. संजय राऊत हा बोगस माणूस आहे. त्यांच्या बद्दल काय बोलणार. ज्यांना सत्यता कळत नाही असत्यावर जे जगत त्यांच्यावर काय बोलणार. संजय राऊत थिल्लर गोष्टी करतात. संजय राऊत गल्लीतून दिल्लीत कोणाच्या आशीर्वादाने गेले हे माहीत आहे. काँग्रेसने सत्यता पचविली पाहिजे. निवडणूक आयोग ही स्वात्त संस्था आहे.'

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, 'हरियाणामधले सुरुवातीचे‌ कल काँग्रेसच्या बाजूने होते. अजूनही वेळ आहे. काँग्रेस सत्तेत येईल. जागा वाटपात वाद नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जात‌ आहोत. त्यात चर्चेतून मार्ग काढला जाईल. आमची जागावाटपाची चर्चा व्यवस्थित सुरु आहे.' तर शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी सांगितले की, 'हरियाणाचा बदलणारा निकाल म्हणजे विरोधकांना मोठी चपराक आहे. भाजपचा मोठा भाऊ आहे. शिवसेना-राष्ट्रवादी त्यांचे सहकारी आहेत. राज्यात देखील असंच चित्र पाहिला मिळेल.आम्ही एवढी विकास कामे केली आहेत त्यामुळे राज्यात महायुतीच सरकार येणार आहे.'

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले की, 'कालच नायब सैनी सांगत होते निवडणूक जिंकून घेण्यासाठी मी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे असं दिसतं पण पूर्ण निकाल होऊ द्या. इथे जसा मराठी माणूस लढवया आहे तसा तिथे हरियाणातील मतदार देखील लढवया आहे.' शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, 'हरियाणामध्ये भाजपा सत्ता स्थापन करणार आहे. तिथे जातीच राजकारण काँग्रेसने केले आहे. फेक नॅरेटिव्ह पसरिविण्याचे काम काँग्रेसने केले आहे. राहुल गांधी जिथे जातात तिथे जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत आहे. हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्रात फायदा होणार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT