Harsh Goenka finds his doppelganger in Shiv Sena MLA Eknath Shinde Twitter/@hvgoenka
देश विदेश

एकनाथ शिंदेंना शोधत असाल तर माझ्यापर्यंत पोहोचा; बड्या उद्योजकाचं गंमतीशीर ट्वीट व्हायरल

Harsh Goenka finds his doppelganger in ShivSena MLA Eknath Shinde : हर्ष गोयंका यांनी अगदी एका ओळीत बंडखोर नेते एकनाथ शिंदेंशी संबंधीत गंमतीशीर ट्वीट केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय चर्चेत खळबळ माजवली आहे. सेनेचे चाळीसपेक्षा जास्त आमदार सध्या एकनाथ शिंदे गटाकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. सध्या ते गुवाहाटीत आहेत आणि लवकरच महाविकास आघाडीला झटका देण्याच्या तयारीत असल्याची सुत्रांची माहिती आहे. या सगळ्या राजकीय रणधुमाळीत एक एकनाथ शिंदेंशी संबंधीत एक गंमतीशीर आणि अराजकीय बातमी समोर आली आहे. देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि आरपीजी एंटरप्रायझेसचे (चेयरमन) अध्यक्ष हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी अगदी एका ओळीत बंडखोर नेते एकनाथ शिंदेंशी संबंधीत गंमतीशीर ट्वीट (Viral Tweet) केलं आहे. या ट्वीटवर तेवढ्याच गंमतीशीर कमेंट्स आल्या आहेत. (Harsh Goenka Tweet About Eknath Shinde)

हे देखील पाहा -

उद्योजक हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे. यात त्यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि स्वतःचाच फोटो शेयर केला आहे. या फोटोत एकनाथ शिंदे आणि हर्ष गोयंका यांची दाढी (Beard)सारखीच दिसत आहे. चेहऱ्याचा रंगही सारखा आहे. यात गोयंका यांचा चेहरा एका बाजूने पाहिल्यास ते बऱ्यापैकी एकनाथ शिंदे यांच्यासारखेच दिसतात. याचाच फायदा घेत गोयंका यांनी गंमतीशीर ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "In Guwahati, if anyone wants to reach me" म्हणजे, "मी गुवाहाटीत आहे, कुणाला भेटायचं असेल तर पोहोचा" अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटला हजारो लाईक्स आले असून शेकडो कमेंट्स आल्या आहेत. गोयंका यांच्या फॉलोअर्सनाही फनी ट्वीट खूप आवडले. एका फॉलोअरने लिहिले की, उद्योजकाचा ड्युप्लीकेट (Doppelganger) शिवसेना आमदार आहे हे मला माहित नव्हते. तर दुसर्‍या फॉलोअरने निदर्शनास आणले की तिला हे जाणून आनंद झाला की एखाद्याला विनोदाची भावना आहे, कारण महाराष्ट्रात त्याचा पुरवठा कमी आहे.

कोण आहेत हर्ष गोयंका? Who Is Harsh Vardhan Goenka

हर्षवर्धन गोयंका (जन्म 10 डिसेंबर 1957) हे भारतीय RPG समूह समूहाचे US$3.80 बिलियनचे सध्याचे अध्यक्ष आहेत. ते आर. पी. गोयंका यांचे ज्येष्ठ पुत्र आणि 1988 पासून आरपीजी समूहाचे अध्यक्ष आहेत. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांमध्ये ते 77 व्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आणि 1281 व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकाता येथून अर्थशास्त्रात पदवी संपादन केली आणि त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमधून एमबीए केले. त्यांचा एक धाकटा भाऊ संजीव गोयंका आहे ज्यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार व्यवसाय संपत्तीची वाटणी केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Maharashtra Live News Update : निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

SCROLL FOR NEXT