Harbhajan Singh social media
देश विदेश

Harbhajan Singh : भाजप प्रवेशाची नुसती हवा सुटली; राजकीय पारा चढला! हरभजन सिंगची सुरक्षा काढून घेतली

harbhajan singh security withdrawn punjab bjp entry news : हरभजन सिंग आम आदमी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनेच पंजाब सरकारमध्ये हालचाली वाढल्या. सरकारने हरभजनची सुरक्षाव्यवस्थाच काढून घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Nandkumar Joshi

आम आदमी पक्षातील सात खासदार भाजपमध्ये जाणार असल्याचं वृत्त धडकलं आणि पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग आला. राघव चढ्ढा यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्यानंतर आता हरभजन सिंगची सुरक्षाही काढून घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Punjab Govt Removes Security Cover of Harbhajan Singh) हरभजनच्या घराबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनाही हटवण्यात आले आहे.

आम आदमी पक्षात मोठी बंडखोरी झाल्याचे सध्या पाहायला मिळते. खासदार राघव चढ्ढा यांच्यासह सात खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. (Harbhajan Singh Security Withdrawal) हरभजन सिंग सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा चड्ढा यांनी केल्यानंतर राजकीय पारा चढला आहे. याआधी चड्ढा यांचीही सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने चड्ढा यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आता हरभजन सिंगचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून त्यालाही सुरक्षा दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंजाब सरकारने हरभजनला झेड दर्जाची सुरक्षा दिली होती.

अलीकडेच आम आदमी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले राघव चढ्ढा यांनी खळबळजनक दावा केला होता. सात खासदारांमध्ये हरभजन सिंगही असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, हरभजनकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या 'ऑपरेशन'नंतर राजकारण प्रचंड तापलं आहे. भाजप आणि आम आदमी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत.

हरभजनचे पीए काय म्हणाले?

हरभजन सिंगचे पीए मनदीप सिंग यांच्या म्हणण्यानुसार, पंजाब सरकारने हरभजन यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर हरभजन यांच्या जालंधर येथील घराबाहेरील सुरक्षारक्षक हटवण्यात आले आहेत. या घडामोडींवर हरभजन सिंगकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - पुण्यातलं तापमान गेल्या आठवड्याभरापासून 40°c वर

मोठी बातमी! शरद पवार गटाच्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक; काय आहे प्रकरण?

लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादाचा भयानक शेवट; तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Face Hair Removing Tips: चेहऱ्यावर येणाऱ्या केसांमुळे वैतागलात? टेन्शन घेऊ नका, ५ फेसपॅक वाढवले तुमचं सौंदर्य

Ritesh Deshmukh: 'महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान खपवून घेणार नाही', धीरेंद्र शास्त्रींना रितेश देशमुखांनी सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT