UP Accident  Saam Tv
देश विदेश

Accident: करवाचौथआधी भयंकर घडला, भरधाव ट्रकने महिलेला चिरडलं, नवऱ्याच्या डोळ्यासमोर सोडले प्राण

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये करवाचौथची तयारी करण्यासाठी निघालेल्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. भरधाव ट्रकने महिलेला चिरडले. नवऱ्याच्या डोळ्यासमोर महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • करवाचौथच्या आदल्या दिवशी भयंकर अपघात

  • भरधाव ट्रकने ३५ वर्षीय महिलेला चिरडले

  • महिलेचा नवऱ्याच्या डोळ्यासमोर जागीच मृत्यू

  • अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यामध्ये अपघाताची भयंकर घटना समोर आली आहे. करवाचौथच्या आदल्या दिवशी महिलेचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. हापूर जिल्ह्यातील गुलावती रस्त्यावर ही घटना घडली. करवाचौथसाठी खरेदी करायला जाणाऱ्या महिलेला भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भाटियाना गावामध्ये राहणारी ३५ वर्षीय अनुराधा नवरा हरिओमसोबत करवाचौथची तयारी करण्यासाठी बाजारात जात होती. दोघेही गुलाओठी येथील बाजारात दुचाकीवरून जात होते. याचवेळी गँग कॅनाल पुलावर पोहचले असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. चालक खड्डा वाचवण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक अनियंत्रित झाला. या ट्रकने महिलेला चाकाखाली चिरडले.

या अपघातामध्ये महिलेने नवऱ्याच्या डोळ्यासमोर प्राण सोडले. अपघातामध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर सर्वत्र पडले. तिचे हृदय बाहेर पडून रस्त्यावर पडले आणि ते बराच वेळ धडधड करत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत होते. घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातामध्ये मृत महिलेचा नवरा गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT