Manasvi Choudhary
उन्हाळ्यात शरीरात घाम येतो, केसांमध्ये घाम आल्याने केस तेल, चिपचिपे होतात. केसांतील घामामुळे टाळू तेलकट होतो यामुळे केसांमधून दुर्गंधी येते.
केसांमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून केस धुण्यासाठी महिला केमिकल शॅम्पूचा वापर करतात मात्र यामुळे केस खराब होतात.
घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही केसांच्या दुर्गंधीवर मात करू शकता.
कोमट पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करून केस धुतल्याने केसांमधील दुर्गंधी, तेल निघून जाते केस नैसर्गिक रित्या स्वच्छ होतात.
लिंबाचा रस केसांसाठी चांगला उपाय आहे. शॅम्पू लावल्यानंतर थोड्या पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून टाळूला लावा.
केसांमधील दुर्गंधी घालवण्यासाठी गुलाबजल वापरणे फायदेशीर आहे.
घामामुळे केस चिपचिपे होतात यामुळे डोक्यातून देखील वास येतो यासाठी तुम्ही स्काल्पला ऑलिव्ह ऑइल लावा.
कडुलिंबाच्या तेलात आयुर्वेदिक गुणधर्म असतात केसांना कडुलिंबाच्या तेलाने मालिश केल्याने केसांतील चिपचिपेपणा दूर होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.