Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Dombivli News : राष्ट्रीय फुटबॉलपटू लक्ष्मण गुंडप यांचा डोंबिवलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी पुढील १० महिने चालता येणार नाही, असे सांगितले आहे.
Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही
Dombivli NewsSaam Tv
Published On
Summary
  • राष्ट्रीय फुटबॉलपटू लक्ष्मण गुंडप यांचा डोंबिवलीत भीषण अपघात

  • या अपघातात गुंडप यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे

  • डॉक्टर यांनी गुंडप यांना १० महिने चालता येणार नसल्याचं सांगितलं आहे

  • अपघातानंतर आरोपी चालक फरार आहे

  • गुंडप यांच्या कुटुंबीयांनी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली प्रतिनिधी

क्रीडा विश्वातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय फुटबॉलपटू लक्ष्मण गुंडप यांचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात गुंडप यांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे. दरम्यान फुटबॉलपटू लक्ष्मण गुंडप यांना पुढील १० महिने चालता येणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेने गुंडप यांना मोठा फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील जिमखाना रोडवरून लक्ष्मण गुंडप आपल्या मुलासोबत क्रीडांगणावर सरावासाठी निघाले होते. मुलगा सायकलवर आणि गुंडप दुचाकीवर होते. याच दरम्यान विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव कारने प्रथम मुलाला, मग गुंडप यांना धडक दिली. धडकेनंतर त्यांना १५ ते २० मीटरपर्यंत फरफटत नेलं. या अपघातात गुंडप यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही
MHADA Lottery Cancel : म्हाडा विजेत्यांना मोठा दणका! घराचा ताबा न घेतल्याने हक्क रद्द होणार

या अपघातामुळे गुंडप यांचा आतापर्यंत ५ लाख रुपये खर्च झाला असून पुढील उपचारही करावे लागणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना १० महिने चालता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांच्या सामाजिक कार्यावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर अनेक दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीचा शोध लागलेला नाही.

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही
Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

संबंधित अपघाताप्रकरणी कारचा नंबर असूनही, “चालक सापडत नसल्याने आत्ता गुंडप आणि त्यांच्या कुटुंबाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी लवकरात लवकर आरोपीला अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गुंडप आणि त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रीय फुटबॉलपटू लक्ष्मण गुंडप यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com