हॅलोविन वीकेंडदरम्यान गोळीबाराच्या घटना घडल्या.
या घटनांमध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
गोळीबारात १५ जण जखमी झाल्याची माहिती
हॅलोविन वीकेंडच्या दरम्यान अमेरिकेच्या विविध भागांत झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये किमान ६ जणांचा मृत्यू झालाय. तर १५ जण जखमी झालेत. डॅलस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 'डीप एलम' (Deep Ellum) परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या अनेक घटनांचा ते तपास करत आहेत.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलीस अधइिकारी डॅनियल कोमोक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डीप एलम' परिसरातील गोळीबाराच्या या घटना एकमेकांशी संबंधित आहेत. हॅलोविन सप्ताहाच्या दरम्यान देशभरात घडलेल्या अनेक हिंसक घटनांपैकी या गोळीबाराच्या घटना आहेत.
एका वेगळ्या घटनेत, शनिवारी रात्री अलाबामातील बर्मिंगहॅम येथे 'लीजन फील्डजवळ गोळीबाराची घटना घडली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. ही घटना वार्षिक 'मॅजिक सिटी क्लासिक' फुटबॉल सामन्यानंतर काही वेळातच घडली.
बर्मिंगहॅमचे पोलीस प्रमुख मायकेल पिकेट यांनी सांगितले की, ग्रेमाँट अव्हेन्यूजवळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. दरम्यान ज्यावेळी गोळीबाराची घटना घडली, तेव्हा नागरिक स्टेडियममधून निघून गेली होते. गोळीबार नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलीस प्रवक्ते डी'रेल फ्रीमॅन यांनी सांगितले की, एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना चौकशीसाठी पोलीस मुख्यालयात नेण्यात आले आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, पोलिसांनी काही शस्त्रेही जप्त केली आहेत.
'मॅजिक सिटी क्लासिक' हा अलाबामा स्टेट युनिव्हर्सिटी आणि अलाबामा ए अँड एम युनिव्हर्सिटी यांच्यातील वार्षिक फुटबॉल सामना आहे. या दोन्ही संस्था 'हिस्टॉरिकल ब्लॅक कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज' (HBCUs) आहेत आणि त्यांचे संघ १०० वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. शनिवारी झालेल्या सामन्याला सुमारे ७०,००० प्रेक्षक उपस्थित होते, ज्यामध्ये अलाबामा ए अँड एमने ३१–२८ असा विजय मिळवला. कॉलेज फुटबॉलच्या या विभागातील सर्व सामन्यांपैकी या सामन्यासाठी सर्वाधिक गर्दी जमते. युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेअरजवळ सहा जणांवर गोळीबार करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.